घाटापिंपरी येथे मराठा आरक्षण उपोषणाचा चौथा दिवस : हनुमान चालीसाने सरकारचा निषेध
धामणगाव प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अतरवली वराटी ता.अंबड जि. जालना येथे गेले नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पत्रकार अंकुश तळेकर व पोपट तळेकर हे आज गुरुवार दि ७ पासून आमरण उपोषणास बसले असून यामध्ये तिसऱ्या दिवशी जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिर सभागृह मध्ये हनुमान चालीसा करुन सरकार चा निषेध करण्यात आला. यावेळी घाटा पिंपरी व पंचक्रोशीतील महिला पुरुष अबाल वृध्द व मराठा समाज बांधव मोठ्या सहभागी होत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी घेऊन समाजाने अनेक आंदोलने केली. जगाला हेवा वाटावा असे मुक मोर्चे काढले.परतू सरकारने कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण दिलेच नाही.शांततेच्याच मार्गाने जालना जिल्ह्यातील अतरवली येथे मनोज जरांगे यांनी याच समाजाच्या प्रश्नासाठी व ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते टिकेल यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला.मात्र अहिंसा मार्गाने बसलेल्या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून अमानुष असा लाठीहल्ला करण्यात आला.त्यामध्ये अनेक महिला पुरुष अबाल वृध्द यांना बेदम मारहाण करण्यात आली म्हणून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे तरी आणखी सरकारने ठोस भूमिका आरक्षणाच्या बाबतीत जाहीर केलेली नाही.त्यांची प्रकृती गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गावागावात आंदोलन उपोषण त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सूरु आहेत. घाटा पिंपरी ता आष्टी येथे देखील सामाजिक कार्यकर्ते अंकुश तळेकर आणि पोपट तळेकर यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असून आज गुरुवार दि ७ रोजी सकाळी १० पासून आमरण उपोषण सूरु झाले असून आज तिसऱ्या दिवस आहे आज दि ९ रोजी सायंकाळी सहा वाजता येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर सभागृह मध्ये हनुमान चालीसा व हनुमानाची महाआरती करुन सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी घाटा पिंपरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा व मराठा समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपोषणकर्ते यांना पाठींबा दिला.
stay connected