मुक्तीसंग्राम स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचे 12 सप्टेंबर पासून आंदोलन बीड जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय खांदवे

 मुक्तीसंग्राम स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचे 12 सप्टेंबर पासून आंदोलन - बीड जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय खांदवे 



बीड -: अमृत महोत्सवी वर्षातही स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाकडे शासनाचे दुर्लक्ष

      हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या विविध मागण्या कडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्वतःची घरे नाहीत आणि त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घेतलेले नाही. यामुळे आजारपणात त्यांना दवाखान्यात उपचार घेता येत नाहीत अशी खंत व्यक्त करीत स्वातंत्र्यसैनिकांत तर उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने 12 सप्टेंबर पासून विभागीय आयुक्तालयासमोर समोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब साळुंखे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद मध्ये दिली.

        ते म्हणाले की स्वतंत्र सैनिकांना विविध राज्यात 40,000 मानधन दिले जाते तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी दहा हजार मानधन वीस हजार करण्याचे निर्णय घेतला ती लढ्यात योगदान देणाऱ्या स्वतंत्र सैनिकांच्या वारसांना विनाअट शासकीय सेवेत घेण्याच्या मार्च 1991 चा शासन निर्णयाचा अंमलबजावणी करावी स्वातंत्र्य सैनिकाच्या नोकरीतील अनुशेष भरून काढावा इत्यादी. मागण्या केल्या हे प्रश्न सहा महिन्यात निकाली काढण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी नऊ महिन्यापूर्वी दिले होते मात्र अध्याप अंमलबजावणी नाही यामुळे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे वारस 12 सप्टेंबर पासून विभागीय आयुक्तालयासमोर छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करणार आहेत संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे म्हणाले की स्वातंत्र सैनिक आणि त्यांच्या वारसांचा शासनाला विसर पडला आहे.. म्हणून बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक संघटने मार्फत आव्हान करत आहोत की बीड जिल्हा अध्यक्ष - दत्तात्रय खांदवे

 (9881363043)

आष्टी तालुका उपाध्यक्ष -: ऋषिकेश जालिंदर एकशिंगे (9689087576) राज्य उपाध्यक्ष - तुकाराम पटाईत, बीड कार्याध्यक्ष - भाऊसाहेब गव्हाणे,  कोषाध्यक्ष - विकास बावणे, राज्य कार्याध्यक्ष - जवाहरलाल सारडा, कायदेशीर सल्लागार - श्रीकृष्ण धांडे,, व  जालिंदर रनसिंग,   स्वा.सै. गंगाराम बोडखे. स्वा.सै. बाप्पु थोरवे, बापूराव चौधरी, आसराजी खिलारे, भालेकर कृष्णा, शहाजी थोरवे,  श्रीकृष्ण मरकड नरवडे साहेब किसन थोरवे हनुमंतराव थोरवे पोकळे कल्याण प्रमोद चोरमले मारुती मांढरे महादेव गायकवाडस्वप्निल थेटे, शेंदुरकर सर, नवनाथ भगत, शेकडे अनिल, भाऊसाहेब घोडके, सुखदेव मिसाळ, महादेव गायकवाड, पाराजी चौधरी, बबन औटे, व इतर आदी स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक पाल्य यांनी संपुर्ण बीड जिल्ह्याच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात येते की सर्व स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक कुटुंबियांनी 12 सप्टेंबर 2023 मंगळवार रोजी सकाळी 9:00  वाजता छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयासमोर हजर रहावे ही विनंती..

असे असेल आंदोलन

-१३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत झेंडा मार्च 

-१४ सप्टेंबरी राेजी सकाळी १० वाजता उद्घोष प्रभात फेरी क्रांतीचौक ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकापर्यंत.

- १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील मुख्य रस्त्यावर रास्तारोको -

. -१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय करणाऱ्या जी.आर.ची होळी .-

- १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे.

-१८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे पायी पदयात्रा










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.