खुंटेफळ पुंडी येथील धडाडीचे कार्यकर्ते कृष्णा काकडे सहकार्यांसह गावातील मारुती मंदिरात बसले उपोषणास .
जालना तालुक्यातील अंतरवली येथील लाठी मार घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज पेटून उठलेला आहे. अनेक वर्षापासून ची मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्वच राज्यकर्त्यांनी आजपर्यंत नेहमीच वेगवेगळी आश्वासने देऊन चालढकल करत आणलेली आहे. मगरीचे आश्रु ढाळणारे विरोधी पक्ष आणि सरकारमधील तीन पक्ष या सर्वांनीच मराठा समाजाच्या आरक्षणाकडे वेळोवेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले होते. त्याही वेळी सत्ताधारी भाजपा शिवसेनेने कोर्टामध्ये चालू असलेल्या खटल्याचे दाखले देत लवकरच मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन दिले होते. मात्र आज पर्यंत त्या संदर्भात कुठलेही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.
म्हणूनच आज मराठा समाजाच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. त्यातच चार दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यामध्ये सुरू केलेल्या उपोषण ,आंदोलन स्थळी पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यामुळे मराठा समाज आता पेटून उठत आहे. आज नाही तर कधीच नाही या भावनेतून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने तीव्र होत आहेत.
सरकारने या संदर्भात तातडीने ठोस पावले उचलून मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्यांची तातडीने पूर्तता करावी म्हणून आष्टी तालुक्यातील लोणी गटाचे मराठा समाजाचे युवा नेते श्री कृष्णा काकडे उर्फ के के यांनी आष्टी तालुक्याचे माननीय तहसीलदार यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देऊन आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
गावातील दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये आज सकाळी पासून गावातील काही युवकांना घेऊन त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.
राज्य सरकारने आता मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. मराठा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत सर्व सुरळीत आहे. आता जर लवकर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार सरकारने केला नाही तर सरकार मधील सर्व नेत्यांना याची पुढील निवडणुकीत मोठी किंमत चुकवावी लागेल हे मात्र नक्की.
श्री. कृष्णा काकडे यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना संदर्भातील निर्णय राज्य सरकार घेत नाही तोपर्यंत कुणाच्याही दबावाला बळी न पडता आमचे आमरण उपोषण सुरू राहील.
ग्रामीण भागातील युवकांनी कृष्णा काकडे यांच्या उपोषणास पाठिंबा देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची तयारी दर्शविली आहे.
stay connected