ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध अन्याय अत्याचाराच्या विरोधात धरणे आंदोलन- पॅंथर नितीन सोनवणे
--------------------------------------
आष्टी/ प्रतिनिधी ( संदिप जाधव ) -
देशात राज्यात होत असलेले जातीय अन्याय अत्याचार थांबवणे, कठोर कार्यवाही करणे बाबत भारतीय संविधान बदलले पाहिजे म्हणनाऱ्या बिबेक दबरोय या देशद्रोही वर गुन्हा दाखल करण्यात या तसेच देशभर दलित, आदिवासी, मुस्लिम घटकांवर अन्याय अत्याचार अमानवीय घटना घडत आहे. संविधान धोक्यात आणण्याचे षडयंत्र केंद्र सरकारने केले आहे त्यासंदर्भात अनेक मागण्या घेऊन आम्ही "दलित, आदिवासी, मुस्लिम बचाव संविधान बचाव राज्यव्यापी आंदोलन छेडत आहोत!
मागण्या -श्रीरामपुर हारेगाव अमानवीय प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत स्थानबधतेची कार्यवाही करावी. पिडित तरुणाचे शिक्षण व शासकीय नोकरीची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. २५ लाखांची पीडित कुटुंबाला मदत करावी. आरोपीची मालमत्ता जप्त करावी. पालवन ता, मान, जिल्हा सातारा येते मातंग समाजाच्या महिलेला भर चौकात अमानवीय मारहाण झालेली आहे. कठोर कार्यवाही करून राज्यातल्या महिलांना सुरक्षित करावे. (३) रोहा, रायगड चंद्रकांत कांबळे अनुसूचित जाती बौध्द आहेत. त्यांचं हत्याकांड होऊन पंधरा दिवस झाले तरी आरोप अटक झालेले नाहीत. दिवसा ढवळ्या गोळी मारुन त्यांची हत्या झालेली आहे. ४) ब्राह्मनगाव, ता. सेलू, जिल्हा परभणी दलित महिला उपसरपंच झाली ती जातीयवादाच्या डोळ्यात खुपत होतं त्यांनी तिला राजीनामा देण्याचा आणला ती राजीनामा देत नाही म्हणून तिच्या मुलाला घेरून चटणी टाकून रॉड विट ने भारत क्रूरपणे हत्या केली. यातील आरोपींवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. (५) जालना लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या गरीब मराठा आया बहिणीना आमनुष मारहाण करणाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे. लाठीचार्ज ची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. राज्यात गो-तस्कर च्या नावाखाली बजरंग दल सारखी व इतर कर्मठ संघटना मुस्लिम तरुणांना टार्गेट करत असून सर्रासपणे मारहाण करून दहशत निर्माण केली जात आहे अशा संघटनानवर तात्काळ बंधी आणावी. मुस्लिमांना सुरक्षीत करावे. पौंड, पुणे भागात बौध्द आकाश शिंदे या तरुणाला बैल कापायला घेऊन चालला का म्हणत मारहाण करणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्यावर अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कार्यवाही करावी. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे. शिरूर, पुणे येथील बोंडे या मातंग तरुणास जेवत असताना विनाकारण लाथ घालून अमानवीय मारहाण शिरूर पोलीस स्टेशन येते झाली. तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिसास निलंबित करून अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कार्यवाही करावी. मुदगल, परभणी येथील आंबेडकरी कार्यकर्ते चंद्रमणी घोडके याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. आरोपींवर कठोर कार्यवाही करावी. मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी.कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची नात डॉ. भावना चंद्रकांत गायकवाड यांच्यावर त्यांचा उच्चवर्णीय पती जातीय अत्याचार, मारहान करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत आहे. दोन वेळा अट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कार्यवाही झालेली असल्यामुळे तात्काळ तडीपारीची कारवाई करावी पिडित कुटुंब हे महापुरुषांचे वंशज असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे (११) आदिवासी महिलांना मणिपूर येथे नग्न करून बलात्कार करण्यात आला आरोपींवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. देशात सूनियजितपणे आदिवासी, दलित टार्गेट केला जात आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र येते तोंडावर लघवी करणाऱ्या घटना घडल्या आहेत हे कृत्य दहशतवादी कृत्य घोषित करावे देशात दलित अत्याचार राष्ट्रिय आपत्ती घोषित करावी. शेतकरी महाराष्ट्रात पावस न पडल्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार एकरी मदत जाहीर करावी. शेतीवर अवलंबून असलेल्या भूमिहीन मजुरांना ५० हजाराचे पॅकेज देण्यात यावे.संविधान बचाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार बिबेक दबेरॉय या देशद्रोही प्रवृत्तीने संविधान बदलण्याची भाषा केली आहे. त्याच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे. धर्मराष्ट्राची भडकाऊ भाषण करणाऱ्या कर्मठ संघटनांवर बंदी आणावी. रखडलेल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती सर्व निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. ईव्हीएम मशीन बंद करून लोकशाहीची आधुनिक हत्या थांबवावी.दलित अन्याय अत्याचाराच्या सर्व घटनांमध्ये फास्ट कोर्ट लावावे, सर्व पीडितांना शासकीय नोकरी द्यावी. सर्व पीडितांना पोलीस संरक्षण द्यावे पाच वर्षात झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा तात्काळ आढावा घेऊन सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या प्रमुख नेत्यांसोबत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी संयुक्त बैठक घ्यावी. संविधान बदलण्याची भाषा करणार्या प्रवृत्तीवर कठोर कार्यवाही करावी."नितीन सोनवणे(जिल्हाध्यक्ष) ऑल इंडिया पंधर सेना बीड, डॉ गणेश ढवळे, युनुस शेख,धनंजय सानप, डिंगाबर विधागर,भिमा नरवडे, वैभव चक्रे, राजू पायके, आकाश ढाकणे प्रफुल्ल बचुटे, अजय काकडे , हनुमान भालेराव, कामीनी पवार आदी उपस्थित होते.
stay connected