प्रशासनातर्फे तालुक्यातील तमाम नागरीकांना दक्षता घेणेबाबत आवाहन
आष्टी तालुक्यातील सर्व नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार आष्टी तालुक्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच पुढील काही दिवस बीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तालुका आष्टी प्रशासनातर्फे तालुक्यातील तमाम नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
(1) मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
(2) गडगडाटीच्या वादळादरम्यान व बीजा चमकताना कोणत्याही विदयुत उपकरणांचा वापर करू नये वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रैक्टर्स, शेतीची अवजारे मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.
(3) मोकळे मैदान, झाडाखाली टॉवर्स, ध्वजांचे खांब, विदयुत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या सोबणा-या केबल्स पासून दूर रहावे.
(4) वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्यामध्ये झाकावे जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
(5) नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी
नदीपात्रातुन तसेच ओढे व नाते यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, नदी अथवा ओढे
नात्यांवरीत पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये..
(6) जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
(7) धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.
सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
stay connected