विजय जायभाये काव्यवाचन महोत्सवाचे आयोजन - श्रीराम घडे
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच मराठवाडा प्रदेशाकडून कवी लेखक कलाकार भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच चे संस्थापक उपाध्यक्ष "विजय जायभाये काव्यवाचन महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे. काव्य महोत्सवात राज्यस्तरीय युट्युब व्हिडिओ स्पर्धा आयोजित केलेली आहे. सदर. स्पर्धा 1 ऑक्टोबर 2023 रोजी सुरूवात होईल व 27 ऑक्टोबर दुपारी 12 वाजेपर्यंत स्पर्धेचि कालावधी राहिल. सहभागी कवींना वयाचे व विषयाचे बंधन नाही. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व काव्यसंग्रह मंचाकडे देण्यात येईल. असे मंचाचे मराठवाडा प्रदेश कार्याध्यक्ष अजय कुमार वंगे परभणी जिल्हाध्यक्ष श्रीराम घडे, सहसचिव योगेशजी हरणे, बीड जिल्हाध्यक्ष बारकु आघाव यांच्याकडून सांगण्यात आले.
stay connected