भद्रावतीत सिलांबम ( लाठीकाठी - तलवार) ट्रेंनिग कॅम्प संपन्न
*ऑल चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशन* व *भद्रनाग मल्टिपरपज अमेच्युअर स्पोर्ट्स अकादमी, भद्रावती* द्वारा इनडोअर स्टेडियम,
नीलकंठरावजी शिंदे महाविद्यालय, भद्रावती येथे तालुका स्तरीय सिलांबम ट्रेंनिग कॅम्प नुकताच संपन्न झाला.
खेलो इंडिया क्रीडा मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त तसेच शालेय व युनिव्हर्सिटी खेळ म्हणून मान्यताप्राप्त प्राचीन भारतीय पारंपरिक शस्त्र कला खेळ
सिलांबम ( लाठीकाठी ) या खेळाच्या भद्रावती शहरात नियोजित विकास व प्रसारासाठी या कॅम्प चे आयोजन *डॉ विशाल निळकंठराव शिंदे (संचालक शारिरिक शिक्षण व क्रीडा विभाग)* निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती यांच्या पुढाकाराने व विशेष सहयोगाने करण्यात आले होते.
या कॅम्प ला तांत्रिक मार्गदर्शक म्हणून जिल्हा सिलांबम असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक मास्टर प्रा.दुष्यंत नगराळे सर (सिलांबम स्टेट रेफरी,उपाध्यक्ष - जिल्हा सिलांबमअसोसिएशन,चंद्रपुर), श्री प्रीतम सोनवणे,( नॅशनल मेडलिस्ट - सिलांबम व मर्दानी खेळ ), रेंशी दुर्गराज एन रामटेके ( स्टेट रेफरी व जिल्हा सचिव) यांनी सर्व स्टुडंन्ट्स ना प्रशिक्षण दिले.
या शिबिरात सिलांबम ( लाठीकाठी व तलवार रोटेशन ) चे प्रशिक्षण 08 वर्षावरीलमुला व मुलींना तसेच 45 ते 55 वयोगटातील स्त्री पुरुष यांनी सुद्धा प्रशिक्षण प्राप्त केले.
यावेळी डॉ विशाल निळकंठराव शिंदे (संचालक शारिरिक शिक्षण व क्रीडा विभाग) निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती, जिल्हा उपाध्यक्ष प्रा दुष्यंत नगराळे, जिल्हा सचिव रेंशी दुर्गराज एन रामटेके, श्री पांडुरंग भोयर, श्री श्रीहरी गसकंटी, श्री बंडू करमनकर, श्री रामेश्वर पातसे,श्री संदीप पंधरे, इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या कॅम्प च्या यशस्वी आयोजन साठी विकास दुर्योधन ,करण नेवारे ,क्रिश भोस्कर, शंभू वाघमारे, दिव्या गेडाम, माधवी बोधाने, सौर्या रामटेके, समीक्षा बोधाने, हरिप्रिया बाभुळकर, दीक्षांत रामटेके , सुभाष आत्राम ,पलक शर्मा, आचल हिवरकर, नियाशा शाहु,आर्या कामरे इत्यादी व *भद्रनाग मल्टिपरपज अमेच्युअर स्पोर्ट्स अकादमी,भद्रावती*
जिल्हा परिषद हायस्कूल, नागमंदिर समोर , भद्रावती च्या कोचेस व खेळाडू यांनी संयुक्त प्रयास केला.
stay connected