खुंटेफळ साठवण तलाव पाईपलाईन कामाची निविदा मराठवाडा पॅकेज मध्ये मंजूर झाली हे म्हणणे योग्य नाही
आमदार सुरेश धस यांचे प्रतिपादन
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील पाईप लाईन योजने ची निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाडा पॅकेज अंतर्गत मंजूर झाल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी घोषित करणे योग्य नाही असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले आष्टी येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.. ते पुढे म्हणाले की ,
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावासाठीच्या पाईपलाईन कामाची निविदा अंतिम टप्प्यात असून एका पंप हाऊस च्या कामासाठी मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक यांच्या परवानगी नंतर तसेच जलसंपदा मंत्री यांच्या मान्यतेनंतर या पाईपलाईन कामाची निविदा काढण्याची परवानगी मिळेल ...
अशी प्रक्रिया असताना आणि खुंटेफळ साठवण तलावाच्या काम हे महाराष्ट्र शासनाचे नियमित काम असून या कामाचा मराठवाडा पॅकेजची काहीही संबंध नाही आणि त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीचा हा विषयच येत नाही असे असताना आ. बाळासाहेब आजबे यांनी खुंटेफळ साठवण तलावाच्या पाईपलाईन कामास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूरी मिळाली असे जाहीर करणे हे योग्य नाही.. खुंटेफळ साठवण तलावाचे काम हे फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झालेले असून हे सध्या काम प्रगतीपथावर आहे ..दोन गावांच्या पुनर्वसनाबाबत प्रकटन प्रसिद्ध झाले त्या संबंधीचे काम सुरू आहे.. ४६ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार असून त्याबाबतचा निधी व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे उपलब्ध आहे..
मात्र खुंटेफळ साठवण तलावाच्या पाईपलाईन चे काम मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाले आहे अशी चुकीची माहिती आ. बाळासाहेब आजबे यांनी दिली आहे ते योग्य नाही असेही त्यांनी शेवटी सांगितले ..
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की,
कुकडीच्या प्रकल्पातील ओव्हर फ्लो चे पाणी सीना व मेहकरी धरणा मध्ये सोडण्यासाठी १२०० दलघमी पाणी त्यासाठी सोडण्यात यावे अशी विनंती आपण काल कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष ना.चंद्रकांत दादा पाटील यांचे कडे केले असे सांगून कालवा सल्लागार समितीची लवकर बैठक घेण्याची आपण विनंती केली आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की,
कुकडी प्रकल्पातील ५ पैकी ३ प्रकल्प भरलेले असून त्यापैकी घोड धरण सद्यस्थितीमध्ये ६० टक्के भरलेले आहे..
ही सर्व धरणे भरल्यानंतर ओव्हर फ्लो चे पाणी आपल्याला मिळणार आहे अद्यापही एक ते दीड महिन्यामध्ये हे पाणी सीना धरणातून मेहेकरी धरणामध्ये येईल परंतु मध्यंतरी असे काही जणांकडून समजले की, सीना प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात आले असून लवकरच मेहेकरीमध्ये येणार आहे असे बोलले गेले..परंतु शेतकऱ्यांना याबाबतची वस्तुनिष्ठता माहीती व्हावी म्हणून ..ही माहिती आपण देत असल्याचे ते शेवटी म्हणाले..
stay connected