प्रियकरा सोबत गच्चीवर गेली अन् निर्दयी मातने चिमुकल्या मुलाला गच्चीवरून खाली फेकलं
ग्वाल्हेर - सर्वांच्या नजरा चुकवून प्रियकरा सोबत गच्चीवर गेली…. मागे मागे तीन वर्षाचा मुलगाही आईच्या पाठीमागे गेला आणि जे पाहायचे नव्हते ते नको त्या अवस्थेत ३ वर्षाच्या जतीनने पाहिल्याने आईला धक्काचं बसला आणि मुलगा पतीला सांगून आपल्या पापाचे पितळ उघडे पाडेल या भीतीने पोटच्या मुलाला गच्चीवरून खाली फेकलं त्यात त्या निष्पाप मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे.सनी उर्फ जतिन राठोड (३ वर्ष) असे मृत बालकाचे नाव आहे. ज्योती राठोड असे आरोपी आईचे नाव आहे.ही घटना ग्वाल्हेर जिल्ह्यात घडली आहे. येथील पोलीस कॉन्स्टेबल ध्यान सिंह यांची पत्नी ज्योति राठोड हिचे शेजारी राहणाऱ्या उदय इंदोलिया याच्याशी अनैतिक संबंध होते. याच संबंधातून दोघांनी २८ एप्रिल रोजी आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला घराच्या छतावरून खाली फेकून त्याची हत्या केली होती.मात्र तेव्हा मुलाच्या आईने या घटनेवर पडदा टाकला होता.
या चिमुकल्याचा गुन्हा इतकाच होता की, त्याने आपल्या आईला प्रियकराच्या मिठ्ठीत नको त्या अवस्थेत पाहिले होते. महिलेला वाटले की, तिचा मुलगा पतीला तिच्या प्रेम संबंधाबाबत सांगेल. याच भीतीने तिने आपल्या पोटच्या मुलाला छतावरू खाली फेकले. दोन मजली इमारतीवरून पडल्याने मुलाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याच्यावर जयारोग्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला.घरातील लोकांना वाटत होते की, पाय घसरल्याने त्यांचा मुलगा घराच्या छतावरून खाली पडला व त्याचा मृत्यू झाला.मात्र काही दिवसानंतर ज्योतिने स्वत:च आपल्या पापची कबुली दिली. पतीने त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर हा पुरावा पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी ज्योती राठोड व तिचा प्रियकर उदय इंदोलिया यांना अटक केली आहे. घटनेवेळी उदयही घराच्या छतावर होता. २८ एप्रिल रोजी प्लास्टिक दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ध्यान सिंह यांनी अनेक लोकांना आमंत्रित केले होते. यामध्ये उदयचाही समावेश होता.दरम्यान सर्वांची नजर चुकवून ज्योति आणि उदय घराच्या छतावर गेले होते. त्यावेळी चिमुकला सनीही आईच्या मागे-मागे तेथे पोहोचला. त्याला पाहून आई घाबरली व तिने आपल्याच मुलाची हत्या केली.
stay connected