Crime News : आईनेच केला लहानग्या मुलीचा खून

Crime News : आईनेच केला लहानग्या मुलीचा खून



अकोला ( प्रतिनिधी) – आई सारखे दैवत साऱ्या जगात कुठेही नाही मात्र, आता अतिशय क्रूर अशा मातेचा प्रकार समोर आला आहे. आईनेच आपल्या लहानग्या मुलीचा खून केला आणि त्यासाठी वेगळाच बनाव रचला. या घटनेमुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील बलोदेमधील ही घटना आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती रवी आमले आणि त्यांची पत्नी विजया आमले यांना एक पाच वर्षीय किशोरी नावाची लहान मुलगी आहे. यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. त्यातच विजय आमले ही महिला आपल्या पत्नीला घटस्फोट मागत होती. मात्र घटस्फोट घेतल्यास मुलीचे काय होणार असा प्रश्न दोघांकडे होता. त्यामुळे विजयामुळे हिने आपल्या मुलीचा काटा काढण्याचे ठरविले, म्हणजे अडसर दूर होईल, असा विचार त्यांनी केला आणि त्यातूनच हे भयानक कृत्य केले असावे, असे म्हटले जाते. किशोरीचे वडील रवी आमले यांनी संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्या वेळी घरात कोणी असतानाच आईने तिचा केला असल्याचे समोर येत आहे. तरीही आईनं आपल्या पुढच्या मुलीला का संपवलंय? या मागील गूढ अद्याप कायम आहे. पती-पत्नीच्या वादामध्ये किशोरीचा बळी गेल्याची चर्चा आहे.

किशोरीच्या वडिलांनी पत्नीवर म्हणजे मृत मुलीच्या आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीची वैद्यकीय तपासणी केली अन् अहवालाच्या तपासात अनेक खुलासे समोर येत. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचा केलेला देखावा समोर आला. तर तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. या महिन्याच्या सुरुवातीला किशोरीच्या अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली होती. किशोरी हिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. मुलगी बेशुद्ध असल्याचा पत्नीचा फोन आला असता किशोरी हिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, घटनेवेळी किशोरी आणि तिची आई हे दोघेच घरी होते. त्यामुळे सर्व संशय सध्या पोलिसांना तिच्यावर असून तिच्यावर गुन्हे दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.