देवळाली(माळीमळा)येथे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सप्ताहास प्रारंभ
देवळाली (वार्ताहार )आष्टी तालूक्यातील देवळाली (माळीमळा)येथे सालाबादप्रमाणे हानुमान मुर्ती प्राणप्रतीष्ठा वर्धापण दिना निमीत्त बुधवार दि. ६ पासून शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण सकाळी११ ते दुपारी५ या वेळेत होणार असून संध्याकाळी ७ ते ८या वेळेत हरीपाठ होईल.रात्री १० ते १२ ह .भ .प आदिनाथ महाराज आंधळे माणीकदौंडीकर यांचे हरीकीर्तन होईल ,रात्री १२ वा.श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम होऊन नंतर जागर होणार होणार आहे, तसेच गुरुवार दि.७ रोजी पहाटे ४ते६ काकड आरती,सकाळी ७ ते ८ संतपुजा व सकाळी१० ते दुपारी ५ या वेळेत शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण संध्याकाळी ७ ते ८ हरीपाठ व रात्री ह .भ .प. भागवत महाराज उंबरेकर ( श्री क्षेत्र वृद्धेश्वर ) यांचे ९ ते ११ या वेळेत हारीकीर्तन व नंतर सामुदाईक जागर होईल. शुक्रवार दि.८ रोजी ह. भ. प. काशीनाथ महाराज गणेश गड नागतळा यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे जाहीर हरीकीर्तन होऊन नंतर महाप्रसाद होईल . तरी या सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवळाली (माळीमळा)ता.आष्टी सप्ताह कमीटीच्या वतीने करण्यात आले आहे .
stay connected