चिंचाळा जि.प.शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा
आष्टी प्रतिनिधी
जि .प.शाळा चिंचाळा येथे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती हेमलता तरटे व सरपंच पंडित कल्याण पोकळे यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात सकाळी 9.30 वाजता जमले व शाळेची सजावट केली. शाळेतील इयत्ता सातवी चे विद्यार्थी यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी खालच्या वर्गांना जाऊन लहान विद्यार्थ्यांचा समोर वर्ग घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच आनंद वाटत होता.5 सप्टेंबर 2023 रोजी जी प प्रा शा चिंचाळा शाळेत शिक्षक दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक श्रीमती हेमलता तरटे,सह शिक्षक श्री चव्हान दादासाहेब ,श्री म्हस्के दीपक ,श्रीमती स्वाती खिलारे ,श्रीमती वर्षा गळगटे यांना पुष्प गुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
शिक्षक दिनाची सांगता म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले व शिक्षकांचे आभार मानले.यावेळी मयुरी पोकळे हिने शिक्षकांचे महत्त्व हे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे असते हे आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. अशाप्रकारे शिक्षक दिन चिंचाळा जि.प.शाळेत अतिशय उत्साहाने साजरा झाला
stay connected