डिजीटल मिडिया परिषद पत्रकारांच्या पाठीशी - राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे.
डिजिटल मिडिया परिषदेची संग्रामपूर तालुका कार्यकारिणी गठीत.
संग्रामपूर / प्रतिनिधी
संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील युट्युब चॅनेल आणि पोर्टल चे संपादक, पत्रकारांनी संघटित होणे गरजेचे आहे.शासन मान्यता मिळाली पाहिजे यासाठी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सरांचे नेतृत्वात लढा उभारणे सुरू आहे.पत्रकारांच्या संकटात मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद खंबीरपणे पाठीशी उभी असल्याची ग्वाही डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्हिडिओ काॅलिंग व्दारे संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरावरील बैठकीत दिली.
मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मिडीया परिषदेची संग्रामपूर तालुका कार्यकारिणी बैठक जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांचे अध्यक्षतेखाली वरवट बकाल येथे पार पडली.बैठकीत जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी,जिल्हा सचिव प्रल्हाद दातार,जिल्हा संघटक नारायण दाभाडे,शेगाव तालुका सचिव प्रशांत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात डिजीटल मिडीया परिषद चे संग्रामपूर तालुका सचिव उदेभान दांडगे यांनी संघटनेची ध्येय धोरणे उद्देश समजावून सांगितला.प्रारंभी मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी व्हिडिओ काॅलिंग व्दारे बैठकीसाठी उपस्थित असलेल्या यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार यांच्याशी बोलताना डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे म्हणाले की मराठी पत्रकार परिषदेच्या अधिपत्याखाली सुरू करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची संपूर्ण राज्यात घोडदौड सुरू आहे.काही दिवसापूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव त्याच बरोबर दुरसबीड येथे बैठका घेण्यात आल्या. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर आणि त्यांची जिल्हास्तरीय टीम उत्कृष्ट नियोजन करत आहे. आपल्या भागातील यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार यांच्या हितासाठी आगामी काळात नियोजन केले जाणार असल्याचे सांगत राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदनही केले.
तत्पूर्वी डिजिटल मिडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी नवनियुक्त संग्रामपूर तालुकाध्यक्ष युसुफ शेख,उपाध्यक्ष दयालसिंग चव्हाण,सचिव उदेभान दांडगे, कार्याध्यक्ष रवि सिरस्कार,कोषाध्यक्ष - शे.तौसिफ शे.इस्माईल,संघटक - शेख मतीन शेख लतीफ ,सदस्य - प्रभू पारस्कर,सदस्य - सचिन पाटील ,सदस्य - भास्कर बोन्द्रे,सदस्य - गोपाळ इंगळे,सदस्य - निलेश लहासे,सदस्य - श्याम वाघ , प्रसिद्ध प्रमुख - विवेक राऊत यांना नियुक्तीपत्र देऊन डिजिटल मिडिया परिषद संग्रामपूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. या बैठकीत त्यांनी डिजिटल मिडिया परिषदेंतर्गत लवकरच एकदिवसीय कार्यशाळा घेणार असल्याचे सांगितले.बैठकीचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन जेष्ठ पत्रकार गोपाल इंगळे यांनी व्यक्त केले.




stay connected