मराठा सेवा संघातर्फे कडा येथे राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा

 मराठा सेवा संघातर्फे कडा येथे
राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा


      समाजामध्ये मुला-मुलींचे विवाह जुळवणे ही अत्यंत जिकीरीची गोष्ट झाली आहे. ग्रामीण असो वा शहरी सर्वच लोकांचे राहणीमान उंचावले आहे. मुले आणि मुली उच्च शिक्षित झाली आहेत. त्यामुळे सर्वजण नोकरीच्या मागे लागले आहेत. समाजामध्ये श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली आहे. पालकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. परिणामी विवाहयोग्य वय होऊन सुद्धा अनेकांचे विवाह रखडले आहेत. ही  समाजासमोरील मोठी अडचण होऊन बसली आहे.

     समाजासमोरील या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. तानाजी बापू जंजिरे यांच्या मार्गदर्शनाखाली "राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा"घेण्यात येणार आहे. सेवा संघ प्रणित मराठा वधु वर  व सामूहिक विवाह कक्षाच्या वतीने "परमेश्वर मंगल कार्यालय," धामणगाव रोड, कडा ,तालुका आष्टी ,जिल्हा बीड येथे सदर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळावा रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. या वधु वर परिचय मेळाव्यासाठी पालकांनी आपापल्या पाल्यास सोबत घेऊन वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

    मराठा समाजातील प्रथम विवाह, पुनर्विवाह तसेच विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, विदुर यांच्यासाठी भरपूर स्थळे उपलब्ध आहेत. सदर मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी त्वरित करावी म्हणजे परत संपर्क करणे सोपे जाईल. पालकांनी आपापल्या पाल्यांचा बायोडाटा शिवाजी पाचे 940 32 692 33 किंवा   ॲड.    सीताराम पोकळे 94 21 63 80 55/96 999 25 710 यांच्याकडे पाल्याचा फोटो व अपेक्षासह पाठवावेत. बायोडाटाची हार्ड कॉपी आवश्यक आहे.

     या राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्यास विवाह इच्छुक व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन मराठा वधु वर कक्षा चे अध्यक्ष शिवाजी पाचे कडा, उपाध्यक्ष दिनेश पोकळे धामणगाव, कार्याध्यक्ष ॲड. सीताराम पोकळे पत्रकार आष्टी, डॉ. राजेश थोरवे, इंजि. तात्यासाहेब पोकळे, सुनील तरटे सर ,अशोक उडाणे सर, विष्णू वाघ ,छायाताई कदम यांनी केले आहे.

#####################

   



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.