मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ५९ हजार कोटी रूपांयाच्या विकास कामांना मंजुरी

 मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ५९ हजार कोटी रूपांयाच्या विकास कामांना मंजुरी - आ . आजबे





छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ५९ हजार कोटी रूपांयाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामासाठी १९०७ कोटी रु.ची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती विधान सभा सदस्य आ.बाळासाहेब आजबे  यांनी दिली याबाबत पुढे बोलताना आ.बाळासाहेब आजबे म्हणाले की,आपण मतदार आष्टी पाटोदा शिरूर का.तालुक्यातील विविध विकास कामांचे प्रस्ताव व मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस  यांच्याकडे व संबंधित विभागांकडे केली होती.. त्यापैकीच आज खुंटेफळ साठवण तलाव पाईपलाईन कामाची १३५७ कोटी रु.ची निविदा येत्या दहा ते पंधरा दिवसात निघणार असून उर्वरित विकास कामांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजूरी दिली आहे.

 एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार संघातील विकास कामाला मंजूरी दिल्याबद्दल आपण राज्य सरकारचे शतशः आभारी आहोत.. आष्टी मतदारसंघातील जनतेच्या वतीने  आभार व्यक्त करतो..यामुळे मतदार संघाचे भाग्य उजळणार असून न भूतो न भविष्यती..अशा प्रकारे  २ हजार कोटी रु. किंमतीच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे..ती कामे पुढील प्रमाणे.आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी कोप, पिंपळसूट्टी को . पं सांगली नागपूर कोप सांगवी संगमेश्वर कोप, खडकत एक खडकत कोप दोन या बंधाऱ्याचे लातूर टाईप मध्ये बॅरेज मध्ये रूपांतर करण्यासाठी  प्रत्येकी  ६० कोटी रु. असे एकूण ३६० कोटी रू.शिरूर ता. येथील ब्रम्हनाथ येंळब व निमगाव ( मा ) येथील लातूर बॅरेज साठी प्रत्येकी ३० कोटी रू. असे ६० कोटी रू.आष्टी उपजिल्हा रुग्णालयासाठी ..३५ कोटी रू. पाटोदा येथील प्रशासकीय  इमारत ३० कोटी रू. रोहतवाडी ता. पाटोदा साठवण तलावासाठी १९ कोटी रू.पाटोदा तालुक्यातील उंबरविहीरा साठवण तलावासाठी १५ कोटी रू. आष्टी येथे ३८ कोटी रु. शेतीपूर्वक एमआयडीसी साठीएम.आय.डी.सी. आष्टी व पाटोदा येथील पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. शिंपोरा ते खुंटेफळ सा.त.थेट पाईप लाईन व खुंटेफळ साठवण तलावासाठी १३५० कोटी रू. ची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ही सर्व कामे मार्गी लागल्याने आ.बाळासाहेब आजबे यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहे.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.