निर्दोष मराठा आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचा जाहीर निषेध,
आम आदमी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन
आष्टी। प्रतिनिधी
जालना येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर शुक्रवार दि. 1 सप्टेंबर 2023 रोजी मराठा विरोधी भाजपा गृहमंत्र्याच्या आदेशानुसार पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे लाठीहल्ला केला.पोलिसांनी महिला, वयोवृध्द नागरिक, लहान मुलांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुध्दा मारहाण केली. मोठया प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला या घटनेचा आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून
विविध मागण्यांचे निवेदन मंगळवार दि ५ सप्टेंबर रोजी आष्टीचे नायब तहसीलदार बाळदत्त मोरे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की निर्दोष मराठा समाजावर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम द्यावा, या घटनेची सखोल चौकशी करुन अत्याचार करणाऱ्या दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई
करण्यात यावी.या आमनुष लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या मराठा बांधवांना शासनातर्फे भरपाई व आर्थिक मदत करण्यात यावी. वरील मागण्याची दखल घेऊन मराठा समाजाला दिलासा द्यावा हि आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी
आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. महेश नाथ,
प्रा राम बोडखे,पोपट गावडे, शकील पठाण, शिवानी खेंगरे, अमोल मुळे, अशोक घाडगे, अंजय भोसले आदी उपस्थित होते.
stay connected