maratha Arakshan : आष्टीत जोरदार घोषणाबाजी....
तहसीलदारांना निवेदन. सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा....
आष्टी / प्रतिनिधी -
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या व इतर अनेक मागण्यासाठी, सकल मराठा समाजाच्या वतीने आष्टी तहसिलबर जोरदार निदर्शने करण्यात आली.९ऑगस्ट २०२३ क्रंतिदिनी करण्यात आलेल्या या निदर्शनात मराठा सेवा संघ, जिजाउ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड व मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी भाग घेतला. जोरदार निदर्शने व घोसानाबाजी करण्यात आली. व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा. कोर्टात टिकेल असे ५० टक्केमधील आरक्षण मिळावे. ओबीसी प्रवर्गातील प्रगत जातींना या प्रवर्गातून वगळण्यात यावे. मराठा समाजातील प्रलंबित नियुक्त्या त्वरित कराव्यात .खुल्या प्रवर्गात इतरांना संधी देऊ नये. त्यासाठी योग्य कायदा करण्यात यावा.कोपरडि प्रकरणातील आरोपींना झालेल्या शिक्षेच्या संदर्भात शासनाने त्वरित लक्ष घालावे.२०१७ मध्ये अन्याय झालेल्या पी एस आय,आरटीओ, राज्य सेवा मधील महिलांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री तान्हाजी जनजिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक प्राचार्य शशिकांत कन्हेरे, प्राचार्य सोपानराव निंभोरे
भागचांद झांजे, लक्ष्मण रेडेकर,डॉ. बी. एन. मुटकुळे, प्रा.राम हंबर्डे, रघुनाथ आवारे, डॉ. शेख नदीम, जालिंदर वांदरे , नगरसेवक सुनील रेडेकर,प्रा. ज्ञानेश्वर नवले., अविनाश जगताप, राघव केरुळकर,दीपक पोकळे ,रावसाहेब मुटकुळे, साहेबराव मुटकुळे, तान्हाजी हंबर्डे जिजाऊ ब्रिगेडच्या शीवमती संगीता पोकळे आदी मान्यवरासह दोनशे माराठा युवक, विद्यार्थी, महिला कार्यकर्ते उपस्थीत होते. तहसीलदार यांनी मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून माहिती श्रेष्ठींना कलवण्याचे आश्वासन निदर्शकांना दिलें. व मोर्चा विसर्जित करण्यात आला.

stay connected