आष्टी तालुक्यात जिओला मिळेना रेंज ठिकठिकाणचे टाॅवर असुन अडचण नसून खोळंबा

 आष्टी तालुक्यात जिओला मिळेना रेंज 
ठिकठिकाणचे टाॅवर असुन अडचण नसून खोळंबा 



  देवळाली (वार्ताहार ) - गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात जिओला रेंज मिळत नसल्याने धरसोड होत आहे.ठिकठिकाणचे असलेले जिओ मोबाईल टाॅवर असून अडचण नसून खोळंबा बनले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्वरीत अडचण दुर करावी नसता उपोषणास बसणार असल्याचा इशारा मानवअधिकार चे आष्टी तालुकाध्यक्ष अतुल जवणे यांनी दिला आहे.

     आष्टी तालुक्यातील देवळाली,कडा धामणगांव,घाटापिंपरी, दौलावडगांव, सुलेमान देवळा,धानोरा, अंभोरा ,यासह परिसरात मागील आठ दिवसापासून जिओच्या सिमकार्ड ला रेंज मिळत नसल्याने संपर्क साधताना आवाजाची धरसोड होऊन फोन लागत नाहीत. इंटरनेट चालत नाही.मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसलीच दखल घेतली जात नाही.त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.याची त्वरीत दखल घेऊन रेंजची अडचण दुर करावी अशी मागणी मानवअधिकार चे आष्टी तालुकाध्यक्ष अतुल जवणे यांनी केली आहे




.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.