उल्हासनगर च्या युवकाने दुबईत जाऊन 3 सुवर्ण व 1 ब्रांझ पदक पटकावले..

 उल्हासनगर च्या युवकाने दुबईत जाऊन 3 सुवर्ण व 1 ब्रांझ पदक पटकावले..





 उल्हासनगर  :- (रमेश कांबळे) उल्हासनगर च्या एका गरीब रिक्षा चालकच्या मुलाने स्विमिंग व रनिंग क्षेत्रात नैपुण्य संपादन केले. ज्याने यापुर्वी राष्ट्रीय स्पर्धेत पदकं पटकावली, त्याचे नाव मयुर संतोष भोईर. उल्हासनगर व कल्याण महापालिकेच्या वेशीवरील मानेरे गावात राहणारा हा विशीतील तरूण.त्याला दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील एथलेटिक्सच्या स्पर्धेत भाग घेता यावा म्हणुन मयुरच्या वडिलांनी दुबईच्या स्पर्धेसाठी एक लाख रूपये उभे केले. मात्र ते कर्जाऊ घेतले हे मयुरला कळू दिले नाही. पैश्यांचा बंदोबस्त होताच मयुर दुबईच्या स्पर्धेसाठी रवाना झाला. 3 ऑगस्ट रोजी या पठ्याने स्विमिंगच्या 100 व 200 मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. इतकेच नव्हे 500 मीटरच्या रनिंग स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवले. तसेच स्विमिंगच्या 50 मीटर स्पर्धेत कांस्य पदक असे 3 सुवर्ण पदकं व 1 कांस्य पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले.

अशी माहिती अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यानी पत्रकार कक्षात दिली, आज मालवणकरांनी या तरूण सुवर्ण पदकं विजेत्याचा पत्रकारांबरोबर सुसंवाद घडवून आणला. यावेळी मयुर संतोष भोईर याने आपल्या यशस्वी वाटचालीची व संघर्षाची माहिती दिली.

यावेळी मयुर भोईर याने सांगितले की, माझे वडिल रिक्षा चालक आहेत. मला जर आधी कळले असते की त्यांनी माझ्यासाठी कर्ज काढले आहे तर मी स्पर्धेला गेलोच नसतो व माझ्या वडिलांना हे ठाऊक असल्याने त्यांनी ही बाब माझ्या पासून लपवून ठेवली.

  प्रचंड ध्येयासक्ति असलेला तरूण राष्ट्रीयच नव्हेतर ऑलिंपिक वा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या देशाला सुवर्ण पदक मिळवून देऊ शकतो.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.