Manipur येथील महिलांवर झालेल्या अन्यायाविरोधात Udhasnagar Congress चे निषेध आंदोलन
तहसीलदारांना निवेदन देऊन केला घटनेचा निषेध
उल्हासनगर / रमेश कांबळे :- भारताच्या इतिहासातील मणिपूर येथे घडलेली सैतानाला ही लाजवेल अशी भयंकर, अमानवीय, बीभत्स घटना ज्यामध्ये दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना ७७ दिवसांनंतर उघडकीस आल्यानंतर सुद्धा शासन अजुनही कारवाई करत नाही, बेटी बचाव बेटी पढाओ म्हणणारे सरकार ह्यावर मौन धरून बसलेले आहेत.
या घटनेचा निषेध करण्यासाठी उल्हासनगर काँग्रेस तर्फे तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले व तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.
माजी गटनेता श्रीमती अंजली साळवे निराधार व निराश्रित व्यक्ती विकास विभाग अध्यक्ष प्रा. सिंधुताई रामटेके, सेवादल अध्यक्षा मनीषा महाकाळे , समाजसेविका विजया मोरे यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले, सदर आंदोलनात ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके , प्रदेश प्रतिनिधी वज्जरुद्दिन खान , सेवादल प्रदेश सदस्य मुन्ना श्रीवत्सव ,प्रवक्ता राजेश मल्होत्रा , फॅमिदा शेख, उषा गिरी ,पर्यावरण अध्यक्ष विशाल सोनावणे , महासचिव दीपक सोनावणे , रास्त धान्य दुकानदार अध्यक्ष संतोष मिंडे ,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष निलेश जाधव , सहकार विभाग अध्यक्ष रोहित गोखले , रोजगार विभाग अध्यक्ष सुलक्षण भालेराव ,प्रमोद शिंदे ,आबा साठे ,सुध्दा जोगळेकर ,मालती गवई , कालिंदी गवई , माला मोरे , रेखा गवई , विजया गाडे , साधना पवार , शुभांगी चौहान ,शालिनी वरठी ,पद्मा माने , इंदुबाई बोदडे ,विजया वाघ , राजश्री भालेराव , तनुजा मेश्राम , पगारे ताई , उन्हवणे ताई , श्रेया बेलगे , संगीत देवरे व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.



stay connected