मतदारसंघातील६७ कोटी रुपयांच्या६५ बंधारे व साठवण तलावाच्या कामाची स्थगिती शासनाने उठवली आ.बाळासाहेब आजबे यांची माहिती

 मतदारसंघातील ६७ कोटी रुपयांच्या ६५ बंधारे व साठवण तलावाच्या कामाची स्थगिती शासनाने उठवली आ.बाळासाहेब आजबे यांची माहिती 



आष्टी प्रतिनिधी 

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील ६७ कोटी रुपयांच्या ६५ बंधारे व ढाळेवाडी साठवण तलावाची मिळालेली मंजुरिस मध्यंतरी सरकारने तात्पुरती स्थगिती दिली होती ही स्थगिती उठवावी यासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा केला अखेर आज राज्य सरकारने या कामावरील स्थगिती उठवत ६७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली आहे.

          याबाबत पुढे बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील सी. ना.ब व को प ब आशा 65 बंधाऱ्यांची प्रशासकीय मान्यता आघाडी सरकारच्या काळामध्ये मिळाली होती मध्यंतरी ही प्रशासकीय मान्यता तात्पुरती स्थगित करण्यात आली होती आपण शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ही तात्पुरती स्थगिती उठवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला त्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस कृषिमंत्री धनंजय मुंडे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ही स्थगिती उठऊन या सर्व कामास मंजुरी दिल्याबद्दल मी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्व जनतेच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानतो, या योजनेमधून मतदारसंघातील 64 गावांमध्ये वेगवेगळे  बंधारे होणार असून पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी येथील 04 कोटी 58 लक्ष रुपयांच्या साठवण तलावाचा प्रश्नही मार्गी लागला आहे, त्यामुळे मतदारसंघातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण यापुढेही सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून  मोठा निधी मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे विशेष करून शेतकऱ्यांच्या हिताची कामे मार्गी लावून मतदारसंघात विकास कामे करणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी शेवटी सांगितले. आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नातून आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील या ६७ कोटी रुपयांच्या बंधारे व साठवन तलाव कामास मंजुरी मिळाल्याबद्दल आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे विशेष आभार मानले आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.