Kukdi पाण्यातून लवकरच Seena and Mehekari Dam भरून घेणार : Balasaheb Ajbe

Kukdi पाण्यातून लवकरच Seena and Mehekari Dam  भरून घेणार : Balasaheb Ajbe

 कुकडीच्या पाण्यातून लवकरच सीना आणि मेहकरी प्रकल्प भरून घेणार -आ.बाळासाहेब आजबे 




आष्टी /प्रतिनिधी

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही अद्यापही पर्जन्याने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर असून पिण्याच्या पाण्याची टंचाई होण्यापूर्वीच कुकडीच्या प्रकल्पातुन  डाव्या कालव्याद्वारे  सीना आणि मेहेकरी प्रकल्पामध्ये पाणी सोडून धरण भरून घेण्यासाठी आपण अधीक्षक अभियंता पुणे यांचेकडे पत्र व्यवहार करून याबाबत चर्चा केली आहे अशी माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली आहे.

         याबाबत ते पुढे म्हणाले की ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी सर्वत्र पुरेसा पाऊस पडलेला नाही आजपर्यंत मतदारसंघात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन मतदारसंघातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता दिसत आहे ,या सर्व अडचणी लक्षात घेऊन दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी कुकडी पाटबंधारे मंडळ पुणे येथील अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करून कुकडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सिना आणि मेहकरी धरण भरून घेण्या संदर्भात पत्र दिले आहे..

 त्याबाबत अधीक्षक अभियंता यांनी दखल घेत लवकरात लवकर वरील दोन्ही धरण भरून घेण्यासंदर्भातआश्वस्त केले आहे. मागील तीन वर्षापासून सतत मेहकरी धरण भरून घेण्यात आले आहे त्यामुळे या भागातील व मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नाही ,सीना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यास मेहकरी धरण भरून घेण्यास अडचण भासत नाही त्यामुळे यावर्षी कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत  आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.