Ashti police वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
आष्टी पोलीसांनी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
आष्टी ता.६ (प्रतिनिधी)- तालुक्यातील आष्टी मुगगाव मार्गाने ब्रम्हगांवच्या दिशेने हिरव्या रंगाचा वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत असल्याची माहिती आष्टी पोलीसांना समजताच पोलिसांनी शृंगेरी घाटाच्या पायथ्याला अवैधरीत्या वाळू घेऊन जाणारा ट्रॅक्टर पकडला. पोलिसांना पाहताच चालक पळून गेला असून अज्ञात चालक विरोधात रविवारी (ता.६) आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी स्वीकारल्यापासून अवैध धंद्या विरोधात कड्क मोहीम राबविली जात आहे. रविवारी ब्रम्हगांवच्या दिशेने वीना क्रमांक असलेला हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर वाळू भरून येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवत सदरील ट्रॅक्टर शृंगेरी घाटाच्या पायथ्याशी पकडला. ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा ३ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी अशोक दशरथ शिंदे यांच्या फिर्यादवरून रविवारी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे करत आहेत.


stay connected