Khuntefal Sathvan Talav मुळे पुनर्वसित होणाऱ्या खुंटेफळ आणि कुंभेफळ येथील ग्रामस्थांना पुनर्वसनाच्या सर्व सुविधा मिळणार Suresh Dhas
***********************
आष्टी (प्रतिनिधी)
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत..
आष्टी उपसा सिंचन योजना क्र ३ खुंटेफळ साठवण तलावासाठी खुंटेफळ आणि कुंबेफळ या गावांचे पुनर्वसना संबंधी खुंटेफळ आणि कुंबेफळ येथील रहिवासी, ग्रामस्थ यांच्या पुनर्वसना संबंधी जास्तीत जास्त सुविधा देऊन पुनर्वसन करण्यात येईल... अशी ग्वाही आ.सुरेश धस यांनी दिली.
खुंटेफळ साठवण तलावासाठी खुंटेफळ आणि कुंबेफळ या गावांचे पुनर्वसन होणार आहे त्यासंबंधी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती..
या ग्रामसभेसाठी.. माजी आमदार साहेबराव दरेकर, उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आदित्य जीवने, कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे, आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड, आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,उप अभियंता अशोक खेडकर उपअभियंता श्रीमती अंजुम मुल्ला, अंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,खुंटेफळ ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती मनीषा दिनेश थोरवे कुंबेफळ ग्रामपंचायतचे सरपंच दीपक गाडे, सोलापूरवाडीचे सरपंच मनोज थोरवे यांच्यासह अनेक नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की,
या खुंटेफळ साठवण तलावासाठी सन २०१३ पूर्वी १९० हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे त्यावेळी देण्यात आलेला जमिनीचा मोबदला आजच्या नवीन कायद्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे यापुढे संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला नवीन दरवाढीनुसार मिळणार असल्यामुळे पूर्वीच्या शेतकऱ्यांना देखील याच पद्धतीने वाढीव मावेजा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करीत असून हा खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्प हा परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा असल्यामुळे आपल्या दृष्टीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून कोणताही अडथळा न येता हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांनी शासनास संपूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले यावेळी उपस्थित खुंटेफळ आणि कुंबेफळ येथील शेतकऱ्यांनी थेट खरेदीने भूसंपादन करण्यात यावे अशी मागणी केली आहे त्याबाबत देखील गांभीर्यपूर्वक विचार करण्यात येईल असे आ.सुरेश धस यांनी सांगितले ..
तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र २७ ऑगस्ट २०१४ मधील भूमी संपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना स करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये जमिनीचे मूल्यांकन बाबत शासन निर्णयाची माहिती देण्यात आली तसेच या पुनर्वसित भागामध्ये.. अंतर्गत रस्ते, पक्के रस्त्यांना जोडणारे रस्ते, नाली बांधकाम करणे, पिण्याच्या पाण्याची योजना, जनावरांना पिण्याचे पाण्याचे हौद, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, जनावरांना चरण्यासाठी मैदान,
स्वस्त धान्य दुकान, पोस्ट ऑफिस, दफन भूमी, स्मशानभूमी, स्वतंत्र स्त्री आणि पुरुष प्रसाधनगृहे, प्रत्येक घरासाठी स्वतंत्र वीज कनेक्शन, सार्वजनिक प्रकाशासाठी पथदिवे, अंगणवाडी, उप आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, मुलांना खेळाचे मैदान, समाज मंदिर, पशुवैद्यकीय सेवा, प्रार्थना स्थळे, सिंचन सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
क्षणचित्रे...
-------------
◆खुंटेफळ साठवण तलावा बाबतच्या या ग्रामसभेमध्ये असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांचे लक्ष केवळ आ.सुरेश धस यांचे वरच केंद्रित असल्याचे दिसून आले.
◆ग्रामस्थांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आ. सुरेश धस हेच देत होते.
◆नवीन भूसंपादन आणि दोन्ही गावच्या पुनर्वसनासंबंधी संपूर्ण गावकऱ्यांनी आमदार सुरेश धस यांचाच शब्द अखेरचा असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.




stay connected