पत्रकार रंजित घाडगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

 पत्रकार रंजित घाडगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा  !





केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील मौजे ढाकेफळ येथील पुरोगामी पत्रकार संघाचे केज तालुका अध्यक्ष युवा पत्रकार रंजित घाडगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.


     सविस्तर माहिती अशी की, पत्रकार रंजित घाडगे यांचा वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्यदिना निमित्त आरोग्य शिबीर व रक्त तपासणी शिबिर राबविण्यात आले होते.(दि.१०) ऑगस्ट रोजी हनुमान मंदिर ढाकेफळ (ता. केज) येथे सकाळी १०:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली होती.यावेळी प्रमुख पाहुणे ढाकेफळ येथील ग्रा.प.सरपंच रतन अंधारे, उद्घाटक,डॉ.प्रा.हनुमंत सौदागर,ग्रा.प.सदस्य तसेच आरोग्य शिबीराकरिता उपस्थित असलेले डॉ.सूर्यवंशी,आरोग्य परिचारिका लांब मॅडम,लॅब टेक्निशियन बचुटे,रोहिटे आशा सेविका उषा चटप, यांच्यासह गावतील ग्रा.प.सदस्य अरविंद थोरात,भाऊसाहेब घाडगे,व गावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    महिलांनी आरोग्य शिबिरास मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.पत्रकार रंजित घाडगे यांचा वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्यदिनानिमित्त (१४०) नागरिकांची तपासणी करण्यात आली.यांमध्ये शुगर, बीपी, शरीरातील रक्ताचे प्रमाण,CBC अश्या प्रकारे आरोग्य शिबिरात तपासण्या करण्यात आल्या.व राजकीय,सामाजिक,पत्रकार बांधव,व्यापारी यांच्यासह अनेक माध्यमातून पत्रकार रंजित घाडगे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.