friendship day : मैत्री दिनानिमित्त विशेष लेख

friendship day : मैत्री दिनानिमित्त विशेष लेख.......!



आज मैत्री दिनाच्या तमाम मित्र मंडळींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....!

जीवनात मैत्रीला अनन्य साधारण महत्व असून 'मित्र- मैत्री आणि मित्रत्व' हेच जीवनाचं खर गमक आहे ....!

कुमार विश्वास यांनी खूप छान लिहिलंय 

" बात करो रूठे यारों से ।

  सन्नाटो से डर जाते है ।।

  प्यार अकेला जी सकता है ।

   दोस्त अकेला मर जाता है ।।"

त्यामूळे बोलत रहा संभाषण शेअरिंग सुख दुःख वाटत रहा मैत्री आपल्या जागेवर आणि व्यवसाय, नातेगोते आणि जगातील सर्व गोष्टी एका बाजूला ठेवा .मला तर इतका वाईट अनुभव आलेला आहे माझा एक बालपणीचा मित्र केवळ राजकारणामुळे दुरावरला कारण हेच की त्याची इच्छा होती की मी त्याने सांगितलेल्या पार्टीत काम करावं त्या भडव्याला आज मैत्री दिनाची शप्पत घेऊन सांगतो की बालपण जस निरागस होत त्यात तू आणि मी ज्याप्रमाणे गुंतलो सोबत खेळलो बागडलो, अभ्यास सोबत केला ,कामाला मजुरीला सोबत गेलो ,एका ताटात सोबत खाल्ल घासातला घास एकमेकांना शेअर केला आणि दुसऱ्याची चाकरी करून भडवा दूर झाला बर त्यात त्याला कसलाही लाभ नसतानाही हे त्याने केलं याच वाईट वाटत तो एका नोकरीला आहे कसलीच कमी नाही पण काही विघ्न संतोषी लोकांमुळे उगाचच दुरावला हे अत्यंत वाईट आहे .माणसाला जगताना भौतिक सांसारिक गोष्टी च्या पलिकडची नजर असणार हे मैत्रीचं पवित्र नात तुझी नजर कायमची त्याच्याकाही घाण ठेवून क्षणात तोडलास.त्याच्यासाठी सुट्टी घेऊन येऊन फुकटचा प्रचार करून तो तुझा बाप असल्यासारखी तळमळ आणि इतर नाते तोडलेस बर त्याच्यामागच तुझा नेमका स्वार्थ एखाद काम किंवा एखादा उद्देश तरी सांग ? बरं काय हसिल केला त्यातून तू हे तरी कळू दे? होय तू त्यावर काही आर्थिक सामाजिक किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा लभापोटी केलं असलास तरी तू माझ्या नजरेत कायमचा कोणाचा तरी गुलाम आहेस हेच सिद्ध होतंय .असो तुला तुझी गुलामी लखलाभ.पण मैत्री दिनाच्या तुला एक गद्दार म्हणून काळया शुभेच्या अशी गद्दारी सध्या कॉमन झाली आहे त्यात काहीच विशेष नाही पण माझ्यामते मैत्री या सर्वांच्या पलिकडची असते तिला हे काटेरी कुंपण आणायची गरज नाही .

          मित्रानो मैत्रीचं श्रेष्ठ नात हे या विश्वातील शेवटचं ठरत आहे कारण आपला मोबाईल ,आपल्या एकोप्याच्या भावना ,आपला नुक्लिअरपना याला जबाबदार आहे .आपण विज्ञान युगात फक्त सेल्फ सेंटर्ड झालोत आपल्याला एकमेकांच्या सुख-दुखाची जाणीव राहिलेली नाही आपण स्व मध्ये इतकं गुंतलो आहोत की आपल्या आपणासाठी ,आप्तजनासाठी,मित्र,नातेवाईक नाते गोते जपण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही हे कुठतरी थांबवलं पाहिजे कारण यामुळे आपली सहनशीलता संपली आहे जराही मना विरुद्ध झालेल्या घटनांमुळे आपण विचलित होत आहोत आपला आपल्यावरील ताबा सुटून आपण आत्महत्या,मर्डर,व्यसनाधीनता,खून आणि लुटमार याकडे वळत आहोत आणि ह्याच मूळ कारण आहे आपल्यातली मानसिक जवळीकता थोरा-मोठ्याच मार्गदर्शन नसणं आणि जिवाभावाचे मित्र नसणं .कारण एक मित्र च मनात आलेला वाईट विचार दूर करू शकतो आपल्या आयुष्याला चांगली दिशा देऊ शकतो होय माझा लहानपणीचा मित्र गद्दार निघाला कदाचित तुमचे मैत्री विषयी बरे वाईट संबंध असतील तर नक्की लिहा कळवा कारण बोलल्याशिवाय कळत नाही समोरच्याला आपल्या भावना पोहचल्या पाहिजेत त्याला त्याची चूक कळली पाहिजे म्हणून बोलत व्हा कारण मैत्रीचं मुख्य साधनच संवाद हे आहे ते होन गरजेचं आहे म्हणून हा उहापोह........ 

*लेखन मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर - ९९२२५४१०३०*






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.