मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आयुष्यभर जनसेवा करणार- इंजि. तान्हाजी जंजिरे

 मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आयुष्यभर जनसेवा करणार- इंजि. तान्हाजी जंजिरे




आपल्या समाजातील एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण वाढले आहे. त्यामुळे नातेसंबंध जोपासले जात नाहीत. आई- वडिल, पती-पत्नी, काका - काकी, बहिण-भाऊ कुणालाच एकमेकाजवळ व्यक्त व्हायला वेळ नाही. म्हणून नातेसंबंध व कुटुंब पद्धती बिघडत चालली आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. असे प्रतिपादन इंजि. तान्हाजी बापू जंजिरे यानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करताना केले.

नुकतीच त्यांची आष्टी तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर ५ ऑगष्ट २०२३ रोजी त्यांचा वाढदिवस मराठा सेवा संघातर्फे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राजमाता जिजाऊ वसतीगृह आष्टी येथे संपन्न झालेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष अशोक ठाकरे हे होते.


पुढे बोलताना जंजिरे बापू म्हणाले की, बाळाचा पहिला गुरु आई असते. घराच्या उंबऱ्याच्या आत आईचे संस्कार असतात. घर ते शाळेपर्यंत वडिल गुरू असतात. आणि शाळेमध्ये शिक्षक हे गुरु असतात. पालकाना वाटते मुले घडवण्याची जबाबदारी शिक्षकाची असते, शिक्षक बिचारे शासनाच्या वेगवेगळ्या कामाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. आणि पालकानाही वेळ मिळत नाही. परिणामी पदविधर विद्यार्थ्यास साधा अर्जसुद्धा लिहिता येत नाही. मुलं घरातुनच शिकतात.त्यामुळे आई वडिलानी मुलांसमोर संस्कारित वागणे जरूरी आहे. राजमाता जिजाऊ वसतीगृहाच्या माध्यमातून माता-पिता आणि गुरुजणांचा आदर करणारे विद्यार्थी घडावेत अशा पध्दतीने वसतीगृह चालवले जाईल असेही ते म्हणाले. 

मराठा सेवा संघाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला त्याबद्दल कार्यकत्यांचे त्यानी आभार मानले, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आयुष्यभर जनसेवा करण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला.

सुरवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले. महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रम सुरू करण्यात आला. डॉ. बाबासाहेब मुटकुळे यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक प्राचार्य शशिकांत कन्हेरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मोरे, इंजि. प्रल्हाद तळेकर, उद्योजक कक्षाचे तालुका अध्यक्ष दिनेश पोकळे, पत्रकार ॲड. सीताराम पोकळे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा शिवमती सुवर्णाताई गिऱ्हे, प्राचार्य सोपानराव निंभोरे यांची जंजिरे बापू यांच्या कार्यावर गौरवपर भाषणे झाली. जंजिरे बापू यांचा स्वभाव अत्यंत संयमी, मनमिळावू, सामाजिक प्रश्नावर अतिशय संवेदनशिल असा आहे. त्यांचे नेतृत्व कृतीषिल असुन ते कुशल संघटक आहेत. राजमाता जिजाऊ वसतीगृहाचे रेंगाळलेले कामास त्यांच्यामुळे गती मिळाली. असे सर्वच वक्त्यानी आपल्या भाषणात सांगितले.

मराठा सेवा संघाच्या ३२ कक्षापैकी पुढीलप्रमाणे अकरा कक्ष्याच्या अध्यक्षपदाच्या निवडी यावेळी जाहीर करण्यात आल्या 

१) शिक्षक परिषद- चंद्रशेखर खाडे, २) कृषी परिषद- आबासाहेब खिलारे,३) उद्योजक कक्ष - दिनेश पोकळे,४) साहित्य परिषद - प्राचार्य विठ्ठलराव गुंड,५) वधु-वर सुचक कक्ष - शिवाजीराव पाचे, ६) मुस्लीम ब्रिगेड - शेख रहिम सलिम, ७) न्यायदान कक्ष - अँड. संभाजी दहातोंडे, ८) वारकरी कक्ष - ह. भ. प. पुष्पाताई उमेश जगताप,९) इतिहास कक्ष - डॉ. सरखाराम वांढरे, १०) पत्रकार परिषद - ॲड. सीताराम, पोकळे,११) प्रबोधन कक्ष - प्रा. महेशकुमार चौरे याशिवाय जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपदी सुवर्णाताई गिऱ्हे व संभाजी ब्रिगेड अध्यक्ष पदी अविनाष जगताप यांची यापूर्वीच निवड झालेली आहे.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मराठा महासंघाचे लक्ष्मण रेडेकर सर, बन्सीधर मोरे (बापू), भास्करराव निंबाळकर, सुरेश पवार, इजि. प्रल्हाद तळेकर, डॉ. दत्तात्र्यय नरसाळे, डॉ. बाबासाहेब मुटकुळे, अँड. सूर्यकांत कदम, अँड. सीताराम पोकळे, वसतीगृह व्यवस्थापक दीपक पोकळे यानी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संतोष माने (बीड), महेंद्र मोरे (बीड), गोविंदराव कदम (बीड), कोंडिराम निंबाळकर, उत्तमराव बोडखे, उपसंपादक, दै. झुंजार नेता, बीड आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी भास्करराव निंबाळकर यानी आभार प्रदर्शन केले.

---------------------------------------

शिवश्री अँड, सीताराम पोकळे

अध्यक्ष 

मराठा पत्रकार परिषद, आष्टी




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.