साहित्य भूषण पुरस्कार,२०२३ ने सन्मानित सौ.प्रतिमा अरुण काळे

 साहित्य भूषण पुरस्कार,२०२३ ने सन्मानित सौ.प्रतिमा अरुण काळे



      शनिवार,दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी,ऑल इंडिया धनगर समाज तर्फे,पिंपरी चिंचवड मधिल शिक्षिका,लेखिका,कवयित्री सौ.प्रतिमा अरुण काळे यांना कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक,मा.आमदार श्री.रामहरी ( आप्पा) रुपनवर,तसेच ऑल इंडिया धनगर समाज,दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणजी काकडे सर,नगर सेविका मा.आशाताई शेंडगे मॅडम व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते,खंडोबा माळ ,आकुर्डी पुणे,३५ येथे साहित्य भूषण पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले.विद्यार्थी गुणवंत सोहळ्यात समाजातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली,आपले मोलाचे मार्गदर्शन केले तसेच मा.आमदार शंकरभाऊ जगताप सरांचे ही मार्गदर्शन अनमोल ठरले. मार्गदर्शन भाषणात आप्पाचे मार्गदर्शन अतिशय अभ्यासपूर्ण होते...बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला...इतिहास हा कायम स्मरणात ठेवला पाहिजे,अन् आताच्या युवकांनी नव इतिहास रचला पाहिजे...,जे मनात येईल ते कृतीत येते..तेव्हा..नेहमी सकारात्मक विचार करा,विश्वास ठेवा अन् विश्वास जपायला शिका,बोट धरून चालायला शिका,स्वतः सोबत आपल्या समाजाची ही प्रगती करा..त्यासाठी शिक्षण घ्या.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.