नवी दिल्ली: सीबीआयने सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल्ल यांच्याकडून पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे. ईडीच्या तक्रारीवरून सीबीआयने ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री आणि उच्च विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, अटक करण्यात आलेला व्यापारी अमनदीप सिंग धल्ल, गुरुग्रामचे रहिवासी बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
stay connected