दिल्ली सरकारच्या राष्ट्रीयस्तरीय पुरस्काराने उद्या होणार ॲड.निकाळजे प्रा.जाधव, ॲड.शेकडे सन्मानित..!

 दिल्ली सरकारच्या राष्ट्रीयस्तरीय पुरस्काराने उद्या होणार ॲड.निकाळजे प्रा.जाधव,
ॲड.शेकडे सन्मानित..!



----------------


संदिप जाधव/आष्टी

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या.वर्धापना दिनानिमित्त ओबीसी आयोग दिल्ली सरकार यांच्यावतीने

समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.कडा येथील प्रा.डॉ.मल्हारी जाधव (शिक्षण),आष्टी येथील प्रसिद्ध वकील ॲड.रत्नदीप निकाळजे (विधी),आष्टी शहरातील ॲड.विजय शेकडे (विधी) यांना उल्लेखनीय

कार्यासाठी राष्ट्रीय एकता पुरस्कार देऊन सन्मानित

करण्यात येणार आहे. डॉ.मल्हारी जाधव हे

श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कडा येथे गेल्या १८ वर्षापासून वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी मराठवाडा विभागातील डेअरी

उत्पादन व विपणन या विषयात संशोधन केलेले

आहे, अत्यंत सामान्य परिस्थितीमधून शिक्षण

घेऊन डॉ.मल्हारी जाधव यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेचे कौशल्य प्राप्त करून रोजगार

वाढीसाठी डॉ.जाधव हे नेहमी कार्यरत असतात.

सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमी सहभाग असतो.विद्यार्थ्यांचा त्यांचा संपर्क आणि स्नेह दांडगा आहे, विद्यार्थी

प्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा परिसरात

नावलौकीक आहे.आई वडिलांप्रती अपार श्रद्धा ठेवणारे ते कुटुंबवत्सल पुत्र ही आहेत. बास्केटबॉल या खेळातील ते विद्यापीठ खेळाडू आहेत.त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल ओबीसी आयोग, नवी दिल्ली सरकार यांच्यावतीने घेण्यात

आली. उद्या रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ सायंकाळी चार

वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया,रफी

मार्ग,नवी दिल्ली येथे भव्य समारंभामध्ये ओबीसी कमिशनचे चेअरमन जगदीश यादव आणि सल्लागार अनुप चावला यांच्या हस्ते प्रा. डॉ.जाधव यांना शिक्षण,  ॲड .रत्नदीप निकाळजे (वकील), ॲड. विजय शेकडे (वकील) क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यसाठी राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.रत्नदीप निकाळजे यांचा नुकताच ऑल इंडिया ॲडव्होकेट्स ॲन्ड असोसिएशन्स नवी दिल्ली यांच्यातर्फे आष्टीचे प्रसिद्ध वकील तथा आष्टी वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.रत्नदीप  निकाळजे यांना सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीच्या शताब्दीनिमित्त ऑल

इंडिया फेडरेशन ऑफ ॲडव्होकेट्स ॲन्ड असोसिएशनतर्फे उत्कृष्ट वकिली करणाऱ्या देशातील १०१ वकिलांना

सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन

फेडरेशन ऑफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या तिघांना मिळणाऱ्या पुरस्काराबद्दल सामाजिक,राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.