उल्हासनगर येथे जागतिक स्तनपान सप्ताहाची सांगता
उल्हासनगर दि :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी उल्हासनगर अधिनस्त सर्व २१७ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात १ ते ७ आॕगस्ट २०२३ या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह २०२३ साजरा करण्यात आला बीट क्रमांक सहा अंतर्गत गायकवाड पाडा येथे स्तनपान सप्ताहाचा समारोप करण्यात आला. सदर सप्ताहात "स्तनपान सक्षम करणे: काम करणाऱ्या पालकांसाठी एक फरक"या थीमवर आधारित मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली..या वर्षीच्या थीममध्ये सामान्य आणि सिझेरियन दोन्ही प्रसूतीमध्ये बाळाला जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपानाची लवकर सुरुवात सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले होते..या सप्ताहात प्रभावी जनजागृती करण्यासाठी प्रकल्प कार्यक्षेत्रात पुढील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..सर्व विभागांमध्ये पहिल्या दिवशी रॕलीचे आयोजन करण्यात आले होते मुक्त संवाद, चर्चासत्र, नुक्कड नाटक, प्रत्यक्ष स्तनदा मातेला गृहभेट आहार व आरोग्य या विषयांवर प्रश्नमंजुषा बाळाच्या जन्मानंतर एका तासाच्या आत करावयाच्या स्तनपानाचे व एक हजार दिवसांचे महत्व पटवून देण्यात आले..यासाठी अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात वैद्यकीय अधिकारी, मुख्यसेविका अंगणवाडी सेविका, मदतनिस, आरोग्य सेविका, आशा सेविका, यांच्यासोबतच विभागातील पालक, किशोरी मुली, सनदामाता गर्भवती महिला यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता..फाऊंडेशन फाॕर मदर अॕण्ड चाईल्ड हेल्थ ही स्वयंसेवी संस्थाही या सप्ताहात सहभागी झाली होती.
या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विजया कुंभार, शोभा चौगुले, श्रुतिका मोहिते, सुषमा केणी, ज्योती सोनवणे या मुख्यसेविका सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना मार्गदर्शन करत होत्या..



stay connected