कानडी खुर्द येथे पती पत्नीस बेदम मारहाण, महिलेचा गर्भपात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 कानडी खुर्द येथे पती पत्नीस बेदम मारहाण, महिलेचा गर्भपात
अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tejwarta News Network









आष्टी ता.७ (बातमीदार)- आपल्या शेतातून गवत घेऊन पती पत्नी दुचाकीवरून घराकडे येत असताना अचानकपणे भावकीतील ८ व्यक्तींनी प्लंबिंग पाईप, काठी तसेच लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी (ता.२) आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द येथे घडली. या मारहाणीत गर्भवती महिलेचा गर्भपात झाला असून शिवाजी बनसोडे यांच्या फिर्यादीवरून रविवारी (ता.७) अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शिवाजी बबन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी व माझी पत्नी अर्चना बनसोडे आम्ही दोघे बुधवारी (ता.२) सकाळी साडेआठच्या सुमारास शेतातुन गवत घेऊन दुचाकीवरून घराकडे येत असताना आमच्या भावकीतील अशोक परमेश्वर बनसोडे, परमेश्वर नामदेव बनसोडे, ज्ञानेश्वर नामदेव बनसोडे, शुभम ज्ञानेश्वर बनसोडे, दीपक परमेश्वर बनसोडे, शुभांगी अशोक बनसोडे, अरुणा ज्ञानेश्वर बनसोडे, सीमा शुभम बनसोडे (सर्व रा. कानडी खुर्द, ता.आष्टी) यांनी गाडीला आडवे येऊन गाडीवरून खाली ओढत हातातील प्लंबिंग पाईप, काठीने मारहाण करत जखमी केले. त्यावेळी पत्नी भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही लाथाबुक्याने मारहाण केली. पत्नी सांगत होती की मी गर्भवती आहे मला मारू नका तरीसुद्धा पत्नीच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले. पोटात झालेल्या मारहाणीमुळे पत्नीचा गर्भ पडला असल्याचे डॉक्टरांनी  सांगितले. रविवारी वरील व्यक्ती विरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करत आहेत.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.