महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर उ.म.पा. प्रशासन खडबडून जागे.
निवेदन दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला तात्काळ सुरुवात.
उल्हासनगर दि :- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष श्री काळू थोरात आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी "उल्हासनगर शहराच्या रस्त्यांवरील धोकादायक,जीवघेणे खड्डे तात्काळ भरा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा" असा निर्णायक ईशारा निवेदनाच्या माध्यमातून उ.म.पा. प्रशासनाला दिल्यानंतर उल्हासनगर महानगर पालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आणि दुसऱ्याच दिवशी पॅनल क्रमांक १ येथील गुलशन नगर परिसरातील,उल्हासनगर २ येथील अमरधाम चौकातील रस्त्यांवरील धोकादायक,जीवघेणे खड्डे तात्काळ भरण्यास सुरुवात झाली.
उमपा आयुक्त,अतिरिक्त आयुक्त तसेच उ.म.पा. चे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि उ.म.पा. प्रशासन यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने मनःपूर्वक आभार तसेच परिसरातील जणसामान्यांकडूनही उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मैनुद्दीन शेख यांनी सांगितले.
यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे काळू थोरात,समाजसेवक वसीम शेख,कैलास घोरपडे,दीपेश धारिवाल,फयाज शेख,भागवत बटोळे,जगदीश माने,अश्फाक शेख,प्रदीप कुंवर,अजय इंगोले,सायमंड राव,अविनाश बावणे उपस्थित होते.


stay connected