सरस्वती माध्यमिक विद्यालय,सिंधूनगर,निगडी या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम.

 सरस्वती माध्यमिक विद्यालय,सिंधूनगर,निगडी या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम.




९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त,व संस्थापक,अध्यक्ष मा.श्री.गोविंदराव दाभाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त सरस्वती माध्यमिक विद्यालय,सिंधूनगर,निगडी या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम.


       आज बुधवार दिनांक ९/८/२३ क्रांती दिनानिमित्त व आदिवासी दिनानिमित्त व उद्या गुरुवार दिनांक१०/८/२३ मा.संस्थापक श्री.गोविंदराव दाभाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेत स्काऊट गाईड युनिट तर्फे क्रांतिवीरांना मानवंदना व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. गोविंदराव दाभाडे (संस्थापक नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी) तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती शमा शिकलगार, मुख्याध्यापिका श्रीमती साधना दातीर, इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून स्काऊट गाईडना मार्गदर्शन केले.सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी क्रांती दिनाचे महत्त्व,श्री.कैलास कोशिरे सर यांनी झाडांचे महत्त्व तर सौ.रेश्मा बनसोडे मॅडम यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले,सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी सर्वांचे शब्द सुमनांनी आभार मानने.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्काऊटर कैलास कोशीरे, गाईडर श्रीमती बनसोडे रेश्मा, श्रीमती काळे प्रतिमा यांनी अथक परिश्रम घेतले.

⚜️🌹⚜️🎯👍🎯🌹⚜️





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.