शेतकर्याचे कांदा अनुदान शेतकर्याना मिळणार केव्हा ? : रवि काका ढोबळे .

 शेतकर्याचे कांदा अनुदान  शेतकर्याना मिळणार केव्हा ? : रवि काका ढोबळे .

Tejwarta



कडा / प्रतिनिधी : --

शेतकऱ्यांना शासनाने प्रतिक्विंटल 3 रुपये 50 पैसे अनुदान देण्याची घोषणा केली होती पण अद्याप शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचे अनुदान मिळालेले नाही .





फेब्रुवारी मार्च मध्ये कांद्याला कमी भाव असल्यामुळे शासनाने प्रत्येक शेतकऱ्याकडूनज्या दुकानदारांना कांदा विकण्यात आला होता त्या दुकानदाराची कांदापट्टी घेऊन कागदपत्रे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जमा करण्यास सांगितले होते तरी सर्व शेतकऱ्यांनी ते सर्व कागदपत्राची पूर्तता केली तरी सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना कसलेही खात्यावर अनुदान पडले नाही .तरी मुख्यमंत्री यांनी पावसाळी अधिवेशनात सांगितले होते की 14 ऑगस्ट 2023 पर्यंतप्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर कांद्याचे अनुदान जमा होईल परंतु अद्याप कसल्याही प्रकारचा एक रुपयाही खात्यावर जमा झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळणार केव्हा असा प्रश्न ? झाला आहे .

तसेच शेतकऱ्यांच्या खात्याला केवायसी बंधनकारक केले आहे  शेतकऱ्यांच्या खात्याला केवायसी बंधनकारक ही अट रद्द करावी व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे जर शेतकऱ्यांच्या खात्यावर 8 दिवसात पैसे जमा नाही झाली तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र अशी आंदोलन करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी तेज वार्ताशी बोलताना सांगितले .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.