हंबर्डे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

 हंबर्डे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन



आष्टी  (प्रतिनिधी) : येथील हंबर्डे महाविद्यालयात आज शनिवार (दि. १९) रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे यांनी केले आहे..


आष्टी येथील आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय आणि कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक शास्त्र अशा विविध शाखांमध्ये ज्ञानदानाचे अखंड कार्य करत आहे. नॅक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेने दर्जा देऊन महाविद्यालयाचा गौरव केला आहे.


विद्यापीठानेही शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षण करून दर्जा दिला आहे. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाची मातृसंस्था आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे


'पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल' मागील १० वर्षापासून इंग्रजी माध्यमाचे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत आहे. या वर्षीपासून अॅड. बी.डी. हंबर्डे विधी महाविद्यालय व कुलगुरू इंटरनॅशनल सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या रूपाने संस्कारमय ज्ञानदानाच्या कार्याचा विस्तार झाला आहे. यावर्षी संस्था व महाविद्यालय पन्नास वर्षे पूर्ण करत आहेत. हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे, सचिव अतुलशेठ मेहेर, सर्व मान्यवर संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शनिवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हंबर्डे महाविद्यालय सभागृहात उपस्थित रहावे असे प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे यांनी आवाहन केले आहे.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.