आष्टी तालुका काँग्रेस पक्षाचा
मराठा आरक्षणाला पाठिंबा
............. रवी ( काका) ढोबळे
मराठा आरक्षणाची मागणी अत्यंत जुनी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचे लाभ मिळतात. विदर्भातील देशमुख व मराठवाड्यातील पाटील या लाभापासून वंचित आहेत. मग महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात वेगवेगळ्या विभागात असा भेदभाव कशासाठी केला जातो? महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील मराठ्यांचे एकमेकांशी रोटी -बेटी व्यवहार होतात. मग सरकार आरक्षणाच्या बाबतीतच भेदभाव का करते? असे मत आष्टी तालुका काँग्रेस (आय )पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी (काका )ढोबळे यांनी आमचे वार्ताराजवळ व्यक्त केले.
पुढे बोलताना ढोबळे म्हणाले की, आपल्या राज्यातील 93 टक्के मराठा समाज गरिबीमध्ये जीवन जगत आहे. मराठ्याच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळत नाहीत तसेच नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मराठ्यांच्या मुलांची हेळसांड होत आहे. परिणामी अनेकांना नैराश्य प्राप्त होऊन अघटीत प्रकार घडत आहेत. मराठ्यांची मुले शिकावेत यासाठी तरी मराठ्याला आरक्षण देणे काळाची गरज आहे.असेही शेवटी ढोबळे म्हणाले.
##################


stay connected