Rashtrawadi Congress ठाण्यातून नवी क्रांती घडवणार Ajit Dada Pawar
ठाणे (रमेश कांबळे)
आनंद परांजपे, नजीब मुल्ला व त्यांच्या सहका-यांनी अथक मेहनतीने उभे केलेल्या ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष्य राहणार आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीचे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी उघडे आहे की नाही हे मी मुंबईला येताजाताना पाहणार आहे. ९ ऑगस्ट क्रातीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडवणार, असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश प्रवक्ते व ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद पराजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार, ठाणे युवक अध्यक्ष नित्यानंद (वीरु) आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ठाणे सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडविले जावेत, लोकांची मते, विचार, तक्रारी, सोडविण्याचे ठिकाण बनायला हवे. पक्ष कार्यालय हे संवादाचे केंद्र बनायला हवे, नवीन राष्ट्रवादी काॅग्रेस कार्यालयात अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना स्वतंत्र केबिन, पत्रकार परिषद, पक्षाच्या बैठकीसाठी जागा असे प्रशस्त कार्यालय प्रथमच उभारण्यात आलेले आहे. हे कार्यालय जनतेसाठी खुले असायला हवे, मुंबईला जाता येता माझे या कार्यालयावर लक्ष्य राहणार आहे असे सांगून एसआरए प्रोजेक्टमध्ये गरीबांना घरे दिली जातील, युवकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देण्याबाबत आमचा प्रयत्न असणार आहे.यातुन शहराचा, राज्याचा, देशाचा विकास व्हावा यासाठी सत्तेचा उपयोग करण्यात येणार आहे, केंद्राच्या योजना, मेट्रो, विमानतळ, फ्लायओव्हर, नॅशनल हायवे, स्मार्ट सिटी यातुन केंद्राच्या मदतीने आणि नरेंद्र मोदीनी देशाचे नावलौकिक वाढविले आहे.तर शरद पवार हे आमचे आदर्श असून त्यांच्या विचारांवर वाटचाल करीत आहोत असे ना. अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रास्ताविक करताना ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपेयांनी सांगितले की, जुलै महिन्यात कार्यालय उद्घाटनाना कार्यक्रम रद्द झाल्यावर हे कार्यालय उघडू नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते. आज ९ ऑगस्ट क्रांतीदिनी ना. अजितदादांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाल्तावर अनेकांना धडकी भरली आहे. ठाण्यातील जनतेच्या सेवेसाठी, २४ तास प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, राजकारणचे केंद्र म्हणून हे कार्यालय काम करेल.
तर प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी म्हटले की, आजवर पक्ष स्थापनेपासून ठाण्यातील पक्ष चुकीच्या माणसांच्या हाती होता.पक्षात असलेली तकतग आता संपली असून अजितदादांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे. प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी बोलताना माहिती दिली की,राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातुन जनतेचे प्रश्न सोडविले जाण्यास सुरुवात झाली असून येत्या १३ ऑगस्टला ठाण्यातील एनकेटी हाॅलमध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.



stay connected