सैनिक आण्णासाहेब खरपाडे खालापूरी गावचे भूषण - डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील खालापूरी हे गाव पोलिसांचे आणि सैनिकाचे गाव म्हणून ओळखले जाते एके काळी खालापुरी या गावची ओळख 'माणसं मारी खालापुरी' अशी असताना सावकारकीच्या डोहात प्रचंड बुडलेली येथील जनता, व्यसनाधीनतेमध्ये रमण केलेली येथील जनता, शेतकरी कष्टकरी मजुरांचे हे गाव खूप वर्षापासून एक हाती एक आडनावी सत्ता असलेल्या या गावांमध्ये विकासाच्या वाटा रोखलेल्या असताना येथील तरुणांनी एकत्र येऊन शिक्षणाची कास धरून कोणी पी आय, कोणी ए पी आय, कोणी पि एस आय,कोणी पोलीस,कोणी शिपाई,कोणी क्लार्क,कोणी सैनिक, कोणी इंजिनियर,कोणी वकील, कोणी डॉक्टर तर कोणी मोठमोठे अधिकारी,राजकारणी अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये खालापुरी गावचा एक ना एक माणूस आहेच अशाच नोकर वर्गातील अत्यंत मनमिळावू स्मितहास्य आणि मितभाषी व्यक्तिमत्व असलेले अण्णासाहेब खरपाडे यांनी देशाची 21 वर्षे सेवा केली. यानिमित्ताने त्यांचा सत्कार सोहळा खलापुरी आणि शिरूर येथे संपन्न झाला.या देशसेवेचा प्रवास पुणे येथे ट्रेनिंग घेऊन त्यांनी आपल्या कार्याला शुभारंभ केला त्यानंतर जम्मू-काश्मीर येथील बारामुल्ला येथे रुजू झाले त्यानंतर आसाम राज्यांमध्ये काही दिवस त्यांनी बॉर्डर वर काढले,त्यानंतर श्रीनगर जम्मू येथे खूप वर्ष सेवा दिली त्यानंतर बढती होऊन एन एस जी कमांडो पदी त्यांची मुंबई येथे निवड झाली तेथेही सेवा दिली,त्यानंतर छत्तीसगड येथे बदली होऊन शेवटी दिल्ली या ठिकाणी शिफ्ट झाले आणि सरते शेवटी गडचिरोली या ठिकाणी सेवानिवृत्ती घेऊन आपल्या कार्याचा शेवट केला आणि देशसेवेचा 21 वर्षा चा प्रवास पूर्ण केला.म्हणजे तब्बल दोन तप पूर्ण तन-मन-धनाने देशाची सेवा करून गावी खालापूरी येथे आल्यानंतर गावकऱ्यांच्या तर्फे त्यांची भव्य दिव्य अशा पद्धतीची मिरवणूक काढून भव्य नागरिक सत्कार करण्यात आला.हा सत्कार समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला एका सैनीकाची अशी मोठी मिरवणूक काढून गावाने केलेला सन्मान पहाण्याजोगा होता. खालापूरी गावात अनेक सैनिक आहेत खालील प्रमाणे अनेकांनी देशसेवा सैनिक म्हणून केलेली आहे,गणपत परजने, बाळासाहेब पवार,सचिन लोंढे , नितीन वंजारे , देविदास भस्मारे,अशोक पवार, संजय परजणे, पांडू परजणे,विष्णू परजने,सोमिणाथ परजणे,राजेंद्र लोंढे, छगन लोंढे, ज्ञानबा परजने,भाऊसाहेब पवार,गणेश उगले , योगेश रक्टे ,अशोक परजने, राजेंद्र सानप , गोविंद आनंदकर , राजेंद्र मुंढे , अण्णासाहेब खरपाडे ,अनील खरपाडे, इत्यादि सह अनेक फौजी याच गावाने दिले आहेत.गावात देशसेवेच वेड असलेले अनेक तरुण आहेत कोणी भरती झाले आहे तर कोणी त्या प्रवाहात आहे याची प्रेरणा स्वर्गीय अनिल परजने यांनी लाऊन दिली त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक मुलं पोलीस ,फौजी,आणि विविध क्षेत्रात यशस्वी झाले.
सिंदफणा अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकवीस वर्षे देशसेवा केलेल्या सैनिक अण्णासाहेब खरपाडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संत महंत,बँकेचे संस्थापक अजिनाथ गवळी,सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर ,सचिव महादेव काथकडे, एल आय सी कर्मचारी विनायक गवळी,जेधे,कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार खेडकर साहेब,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्युत विभागाचे शिरूर चे इंजिनिअर,उगलमुगले ताई, कातखडे ताई,गवळी ताई,संपादक ,पत्रकार ,ग्रामस्थ, कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.



stay connected