खांडे पारगाव येथील जि. प. शाळेवर शिक्षकांची नियुक्ती तात्काळ करा नसता आंदोलन करू दत्ता सुरवसे तालुका संघटन मंत्री आम आदमी पार्टी

 खांडे पारगाव येथील जि. प. शाळेवर शिक्षकांची नियुक्ती तात्काळ करा नसता आंदोलन करू
दत्ता सुरवसे तालुका संघटन मंत्री आम आदमी पार्टी

Beed


____________________________

बीड _ बीड पासून जवळच असलेले  (खंडोबा वस्ती) खांडे पारगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळे मध्ये दोन शिक्षकांची नेमणूक होती परंतु येथील एक शिक्षक सेवानिवृत्त झाले या शाळेमध्ये एकच शिक्षक शिकवत असताना जि प हे नुसती बघायची भूमिका घेत आहे. इतक्या दिवसापासून शिक्षक सेवानिवृत्त होऊन देखील त्यांच्या जागेवरती दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही यामुळे तेथील  गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अतोनात नुकसान होत आहे तरीपण शिक्षण विभाग हे बघ याची भूमिका घेऊन गप्प का बसली आहे हा मोठा प्रश्न आहे जर  15 ऑगस्ट च्या अगोदर या ठिकाणी शिक्षकाची नेमणूक केली नाही तर आम आदमी पार्टी संपूर्ण गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करेल असे निवेदन बीड येथील जि प शिक्षण विभाग यांना देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव रामधन जमाले तालुका अध्यक्ष भिमराव कुठे तालुका संघटन मंत्री दत्ता सुरवसे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे रवींद्र सपकाळ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.