आ.बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील नागरिकांना मिळणार विमा कवच

 आ.बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त  मतदारसंघातील नागरिकांना मिळणार विमा कवच



आष्टी प्रतिनिधी 

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघातील नागरिकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार बाळासाहेब आजबे  मित्र मंडळ यांच्या वतीने विमा रक्कम भरून सर्व नागरिकांना विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगण्यात आले .

     आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील  भारतीय स्टेट बँकेत पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली आहे या माध्यमातून सर्व नागरिक विमाधारक व्हावेत या उद्देशाने इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत सर्वसामान्य नागरिकांना थेट फायदा होईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घरोघरी जाऊन सर्वसामान्य नागरिकांचे फॉर्म भरून घेऊन स्वतः विम्याची रक्कम बँकेत अदा करणार आहे त्यामुळे मतदारसंघातील लाखो नागरिकांना विमा सुरक्षा मिळणार आहे . पंतप्रधान विमा सुरक्षा योजने बरोबरच आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप, विमा सुरक्षा कवच व इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते येत्या दोन दिवसात विमा सुरक्षा योजनेचे फॉर्म घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांचे विमा भरून घेणार आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.