ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यासाठी, शिक्षण व्यवस्था बदलणे ही काळाची गरज आहे.
विचारवंतांच्या सभेतील सूर.
ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यासाठी आजचे शिक्षण व्यवस्था कुचकामी ठरत आहे. आपले पाल्य घडवण्यासाठी पालकांना आपल्या कुटुंबाची ससेहोलपट करून पाल्यांना कोटा (राजस्थान), लातूर, पुणे, नांदेड येथील खाजगी क्लासेससाठी लाखो रुपये खर्च करून ठेवावे लागते. ग्रामीण भागातील पालकांची कुवत नसते म्हणून त्यांची मुले शिक्षणामध्ये मागे पडतात. त्यासाठी आपल्या शासनाने खाजगी क्लासेस मध्ये दिले जाणारे शिक्षण हे नेहमीच शाळा महाविद्यालयांमध्ये देणे गरजेचे आहे. चेअरमन नितीन विजय यांच्या मोशन इन्स्टिट्यूटचे एक कोचिंग सेंटर आष्टी येथे सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर विचारवंत बोलत होते. या केंद्राचे प्रमुख म्हणून प्राचार्य नागसेन कांबळे हे काम पाहणार आहेत. या मोशन इन्स्टिट्यूट चे कार्यालय प्रमुख म्हणून श्रीमंत सानप हे काम पाहत आहेत.
#इंजि.किशोर हंबर्डे..............
यावेळी बोलताना आष्टी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंजि.किशोर (नाना )हंबर्डे म्हणाले की, शिक्षणाची परिस्थिती बदलायची असेल तर "वस्तुस्थिती"बदलली पाहिजे. दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चांगले चालते. मात्र अकरावी, बारावी आणि सीनियर कॉलेजमधील उपस्थिती अत्यंत नगण्य असते. अवघी एक
दोन टक्के म्हटले तरी चालेल. विद्यार्थी शिक्षण सोडून इतरच उद्योग जास्त करतात. अशी खंतही इंजि. हंबर्डे यांनी बोलून दाखवली. पुढे बोलताना ते म्हणाले की आष्टी तालुक्यात शिक्षण क्षेत्राचे व्यावसायिकरण झाले आहे. परिणामी कॉपीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे आष्टीचे नाव संपूर्ण राज्यामध्ये बदनाम झाले आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे, मुंबई, अंबाजोगाई, लातूर नांदेड ठिकाणाहून विद्यार्थी आष्टी येथील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असतात. ही परिस्थिती सुधारली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
# प्राचार्य सोपानराव निंभोरे
यावेळी बोलताना प्राचार्य सोपानराव निंभोरे म्हणाले की, मडके घडवताना कुंभाराला माती आणि पाणी एकत्र मिसळून खूप वेळ मळावे लागते. हीच परिस्थिती विद्यार्थ्यांची असते. चिखलाचा गोळा असलेल्या विद्यार्थ्यांना लहानपणीपासूनच "बेसिक कन्सेप्ट क्लिअर"करणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. ते काम शिक्षक व पालकांना करावे लागेल. तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.
#शिक्षण तज्ञ मनोज धस,
यावेळी बोलताना शिक्षण तज्ञ मनोज धस म्हणाले की, यशाच्या शिखरावर असलेल्या मोशन इन्स्टिट्यूटने आष्टी सारख्या ग्रामीण भागात केंद्र सुरू करून एक धाडसी पाऊल उचलले आहे. त्यांच्या या धाडसाचे कौतुकच करावे वाटते. आष्टीकरांनी त्यांच्या कामाला दाद दिली पाहिजे. त्यांचे असेल तेवढी फीस मोकळ्या मनाने दिली पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये आष्टीचे नाव इतरत्र नक्कीच आदराने घेतले जात नाही. इथल्या सगळ्या सिस्टीम मुळे तालुका सर्वत्र बदनाम झाला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या बीड जिल्ह्यातून गेल्यावर्षी 150 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवला. त्यापैकी आष्टीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी एमबीबीएस, बी ए एम एस, बी एच एम एस, बीडीएस इत्यादी कोर्सेसना प्रवेश मिळवला आहे. त्यावरून आष्टीच्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच गुणवत्ता आहे. परंतु त्यांना योग्य दिशेने नेले जात नाही ही खरी खंत आहे. दरवर्षी राज्यात 95 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे सुमारे साठ हजार विद्यार्थी असतात त्यापैकी पुढे अवघे 1000 विद्यार्थी टिकतात. आपल्या पाल्याची गुणवत्ता सुधारायची असेल तर मोशन इन्स्टिट्यूटच्या आष्टी येथील केंद्रास पालकांनी सहकार्य केले पाहिजे असे ते शेवटी म्हणाले. मोशन इन्स्टिट्यूट चे बीड जिल्ह्याचे संचालक प्रा. विजय पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून मोशन इन्स्टिट्यूट या संस्थेची माहिती व ओळख करून दिली. आष्टी केंद्रावर कोटा येथून प्राध्यापकांची टीम आणलेली आहे असे त्यांनी सांगितले. आष्टीतील विद्यार्थी यांच्यासाठी विशेष कार्यक्रम घेऊन यश मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. वाल्मीक तात्या निकाळजे, डॉ.शिवाजी राऊत, लक्ष्मण रेडेकर सर,प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय नरसाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंजि. किशोर नाना हंबर्डे यांनी भूषविले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पल्लवी दानी मॅडम यांनी केले.
##################
शब्दांकन...........................
शिवश्री ॲड सीताराम पोकळे, पत्रकार.
आष्टी.
##################
आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.तानाजी बापू जंजिरे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापताना दिसत आहेत. सोबत लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. हनुमंतरावजी थोरवे व इतर कार्यकर्ते दिसत आहेत.



stay connected