सकारात्मक शैली समाजहिताचे Bhimrao Dhonde यांचे काम - Indurikar Maharaj
------------------------------
*माजी आ.भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त
इंदुरीकर यांच्या किर्तनला गर्दी*
------------------------------
-------------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
माजी आमदार भीमराव धोंडे हे या वयातही व्यायाम करतात त्यांची बुद्धी मन आणि शरीर हे बलशाली सक्षम आणि निरोगी असून त्यांची ही सकारात्मक शैली समाज हिताची आणि प्रगतीची असल्याचा गौरव करून इंदुरीकर महाराजांनी माजी आमदार धोंडे यांचे जाहीर कौतुक केले.
सकारात्मक शैली समाजहिताचे भीमराव धोंडे यांचे काम असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे माजी आमदार शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कीर्तन सेवेत ह.भ.प.इंदूरीकर हास्य विनोदाच्या नयनरम्य पवित्र मंडपात हजारो रसिक श्रोत्यांना मानवी धर्माच्या कर्तव्य पाळण्यांचे बाबत अध्यात्मिक शब्दशैलीत विस्तृत मार्गदर्शन करीत होते.यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले की,
'संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे; अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ,ज्ञानापेक्षा देवाचे ध्यान श्रेष्ठ आहे.प्रत्येक व्यक्तीने आपलं मन स्वच्छ ठेवावं निर्मळ असावं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जग सुधारण्याची शक्यता नाही हे कटू सत्य सांगत माजी आमदार भीमराव धोंडे हे या वयातही व्यायाम करतात त्यांची बुद्धी,मन आणि शरीर हे बलशाली सक्षम आणि निरोगी असून त्यांची ही सकारात्मक शैली समाज हिताची आणि प्रगतीची असल्याचा गौरव करून इंदुरीकर महाराजांनी माजी आमदार धोंडे यांचे जाहीर कौतुक केले.ज्याचा आहार सात्विक,संगती चांगली,त्याला आयुष्य अधिक मिळते असे प्रतिपादन ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.यावेळी शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे,माजी आमदार साहेबराव दरेकर , ह.भ.प.निवृत्ती महाराज बोडखे, दिनकर महाराज तांदळे,दादा महाराज चांगुणे,पुणेचे नगरसेवक अक्रूरशेठ कुदळे,साहेबराव मस्के,
विठ्ठलराव बनसोडे,
बाबुशेठ भंडारी,
भाऊसाहेब लटपटे,
इंजिनिअर बाळासाहेब भूकन,सरपंच सावता ससाणे,डॉ.मधुकर हंबर्डे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, संतोषभैय्या चव्हाण,पत्रकार उत्तम बोडखे,नायब तहसीलदार भगीरथ धारक, सेवानिवृत्त तहसीलदार शहादेव गीते,विक्रम पोकळे,प्राचार्य हरिदास विधाते,प्राचार्य दत्तात्रय वाघ,प्राचार्य सुरेश बोडखे,अनिल जायभाये,
अण्णासाहेब भोसले, संजय नालकोल,गौतम ससाणे,ज्ञानेश्वर वाघ, सरपंच पोपट गोंडे, महादेव दानवे, गौतम आजबे, रघुनाथ शिंदे,घनश्याम नरोडे, बबन सांगळे,हौसराव आजबे ,शहादेव नरवडे आदि मान्यवर उपस्थित होते.
इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की,इंस्टाग्राम, फेसबुक, मोबाईल हे प्रत्येकाच्या धर्माला बाधक ठरत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली हाच संदर्भ घेत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या शाळा महाविद्यालयांमधून सकाळी दहा ते पाच या वेळात मोबाईल बंदीचा निर्णय घ्यावा अशी विनंती इंदुरीकर महाराज यांनी केली.प्रारंभी संयोजन समितीच्यावतीने हभप इंदुरीकर महाराजांचे स्वागत करण्यात आले. माजी आमदार भीमराव धोंडे यांचा आणि सौ.दमयंतीताई धोंडे यांचा तमाम मतदार संघातील जनतेच्यावतीने सत्कार करण्यात आला.धोंडे यांना गोरगरिबांची सेवा करण्यासाठी दीर्घ आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करून महाराजांनी आपल्या किर्तन सेवेला प्रारंभ केला.महाराज पुढे म्हणाले, पैसा जास्त झाला की माणुसकी कमी होते अहंकार वाढतो संपत्तीचा हंकार झाला की नाश निश्चित होतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वधर्माला भजावे प्रत्येकाचा धर्म पाळावा मग प्रत्येकाच्या हृदयात देव येतो. नोकरीतून रिटायर झालेले ४० टक्के वृद्धाश्रमात जातात हे दुर्दैव सांगून मी सध्या वाल्या कोळी झालोय हे सांगायला विसरले नाहीत आर्थिक प्रगती पेक्षा शरीर संपत्ती ही सर्वश्रेष्ठ असून आप बुडालो जग बुडाले हे ध्यानात ठेवून माजी आमदार भीमराव धोंडे सारखे शरीर स्वास्थ्य ठेवा व्यायाम करा सात्विक आहार घ्या तुमचे आयुष्य नक्की वाढेल असे आवाहन त्यांनी केले.दारू हे आत्मघाताचे कारण असून दारूमुळे व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होते ही समाजाची अत्यंत दुर्दैवी व्यथा असून त्यांनी तरुणांना व्यसन न करण्याचा सल्ला दिला. ज्याचा आहार सात्विक, संगती चांगली त्याला आयुष्य अधिक लाभते या वास्तवावर त्यांनी भर दिला. ज्याचा पाया ज्ञान, त्याचा कळस वैराग्य असतो. वैराग्याच्या विस्ताराचा पाया नाम असतो ज्याचा शांती खांब आहे त्याचे नाव वारकरी संप्रदाय असल्याचे सांगताच उपस्थित प्रेक्षक भाविक भक्तांमधून प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.माजी आ.धोंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला तीन दिवसापासून मतदार संघात विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवले जात असून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या सर्व उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे आजच्या या कीर्तन सोहळ्याला हजारो भाविक व कार्यकर्ते, मान्यवरांची उपस्थिती होती.




stay connected