आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी महिला शेतकऱ्यांना केशर आंबा रोपाचे वाटप

 आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी महिला शेतकऱ्यांना केशर आंबा रोपाचे वाटप




आष्टी तालुक्यातील पारोडी येथील शेतकऱ्यांना प्रत्येकी 15 केशर आंब्याचे रोपे देऊन एक शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन मार्फत पारोडी येथे करण्यात आले. शेतकऱ्यांना बांधावर केशर आंबा लागवड करण्यात येणार आहे. गावात एकूण 36शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. एकूण 540 केशर आंबा रोपांची लागवड बांधावर केली जाणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढविण्याचा नवीन प्रयत्न केला जात आहे .

या कार्यक्रमास गावचे विद्यमान सरपंच श्रीमती प्रतिभाताई परकाळे, आयसीआयसीआय फाउंडेशनचे जिल्हा विकास अधिकारी श्री चेतन पाटोळे साहेब व तालुका समन्वयक श्री बाळासाहेब कांबळे साहेब यांच्या हस्ते महिला शेतकरी गटांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.

यामध्ये महिला शेतकरी ज्योतीताई सायंबर राणी सांयंबर आशाबाई सांयंबर कुसुम सायंबर दिपाली काळे पद्माबाई काळे नंदा सायबर, ताई परकाळे, शोभा परकाळे, सुनीता सायंबर कांताबाई थोरात, सोनाली थोरात रेखा कसाब यासह सर्व लाभार्थी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.