आष्टी तालुक्यातील मुळेवाडी येथील युवकाचा कांद्याच्या भुसाऱ्यामध्ये जळून मृत्यू
प्रतिनिधी /कडा.
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव हद्दीतील मुळेवाडी येथील नंदू गंगाराम वाणी हा 38 वर्षीय युवक दारूच्या नशेमध्ये कांद्याच्या भुसारत झोपी गेला असता त्या भुसाराला अचानक आग लागल्याने नंदू गंगाराम वाणी हा युवक जळून भस्म झाला त्याच्या पश्चात पत्नी मुलगी व एक मुलगा असा त्याचा परिवार आहे.
नंदू गंगाराम वाणी या युवकाचा चार ते पाच वर्षांपूर्वी अपघात झाला होता त्याचा एक पाय व एक हात निकामी झाला होता नंदू गंगाराम वाणी यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून तर मुलगा 7 वीच्या वर्गात शिकत आहे .
नंदू गंगाराम वाणी या घराच्या समोर असलेल्या कांद्याच्या भुसारामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याने नगर बीड रोड लगत रोडवर चाललेल्या काही प्रवाशांनी ही आग लागल्याने अंभोरा पोलीस ठाणे यांना दूरध्वनी वरून कळवले बाबुराव पोलीस ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी यांनी माहिती मिळतच मुळवाडी येथे घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह जागेवर पि एम केले व जागेवरच त्यांचा दफनविधी करण्यात आले तरी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम रोकडे हे करीत आहेत .


stay connected