इन्स्पायर अबॅकस अकॅडमी द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तर स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव
सनराईज एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ने रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाईन अबॅकस स्पर्धेचे सुखकर्ता लॉन्स, अहमदनगर या ठिकाणी आयोजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी देशभरातून 1052 विद्यार्थी सहभागी झाले होते.
इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे केंद्र असून गरजू व होतकरू महिलांसाठी अबॅकस व वैदिक गणिताचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे.
अकॅडमी ही आपल्या दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट अभ्यासक्रम, गुणवंत व प्रशिक्षित शिक्षक वृंद, बदलत्या काळानुसार ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देणारी अकॅडमी असल्याने गुणवत्तेच्या जोरावर अकॅडमीने देश - विदेशात अनेक ठिकाणी आपल्या शाखांचा विस्तार केला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पैकी आरुष मगर, प्रतीक चौधार, रेयांश राठोड, आर्वी पायाळ, मंजीत काटे, तेजस्विनी शिंदे, प्रणित देसाई, सुजल बोराडे, आदित्य सोनवणे, सार्थक पवार, संस्कृती कोळेकर, समृद्धी थोरवे, संस्कार मुळे, केतन पठाडे, श्रेयसी भोसले, हर्षल पवार, धीरज शिंदे, प्रचीता ढगे या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफी चे सर्वोत्तम पारितोषिक मिळविले.
तसेच अकॅडमीच्या वतीने सौ. शैला देसाई, सौ. रुपाली शिंदे, सौ. स्मिता मेहेत्रे, सौ. वनिता विधाते, सौ. वैशाली उल्हे, सौ. अश्विनी थोरवे, सौ. सुजाता बोठे, सौ. मीरा शेळके, सौ. कोमल करडूळे या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवार्ड हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मा. श्री. गोपाळभाऊ रकटाटे (मा. उपसभापती, पं. स. आष्टी), मा. श्री. बलभीम शेळके (कृषी अधिकारी श्रीगोंदा) यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहराचे लाडके आमदार मा.श्री. संग्राम भैय्या जगताप व पारनेर चे आमदार लोकनेते मा.श्री. नीलेशजी लंके हे होते.
तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. ज्ञानदेव पांडुळे (मा. नगरसेवक, मनपा अहमदनगर), मा. श्री. प्रकाशजी भागानगरे (नगरसेवक, मनपा अहमदनगर), मा. श्री. विक्रमजी अनिलभैय्या राठोड (युवासेना सहसचिव, महाराष्ट्र राज्य),
मा. श्री. उद्धव बापू दरेकर (जि.प. सदस्य बीड), मा.श्री. प्रवीण कोकाटे (सभापती, पं.स. नगर), मा.श्री. माणिकराव विधाते (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अहमदनगर), मा.श्री. दादासाहेब दरेकर (युवा नेते भाजपा), मा.सौ. आशाताई निंबाळकर (जिल्हाप्रमुख शिवसेना, अहमदनगर), मा.सौ. अरूनाताई गोयल (शहरप्रमुख, शिवसेना ,अहमदनगर), मा.श्री. शरद पवार (सरपंच, चिचोंडी पाटील), मा. श्री. दत्तात्रय पानसरे (मा.संचालक, एडीसीसी बँक अहमदनगर), मा.श्री. संजयजी चोपडा (मा.नगरसेवक, मनपा, अहमदनगर), मा.श्री. विकास काळे (भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य), मा.श्री. भास्कर भद्रे (स. पो. नि. अहमदनगर), मा.श्री. महादेव भद्रे (मुख्याध्यापक, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय अहमदनगर), मा.श्री. केशव मोढवे (मुख्याध्यापक, भानेश्वर विद्यालय भानगाव), मा.श्री. रावसाहेब खकाळ (चेअरमन, आंबेश्वर पतसंस्था अंभोरा), मा.श्री. अशोकशेठ चौधरी (उद्योजक अहमदनगर), मा.डॉ.सुभाष वाळके (पं. स. सदस्य आष्टी), मा.श्री. प्रकाशजी पोटे (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर), मा.श्री. चंदूकाका पवार (उद्योजक अहमदनगर), मा. प्रा. अरविंद शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या संचालिका सौ. सत्यशीला भद्रे मॅडम व सौ. अर्चना शेळके मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले व त्यांना या कार्यात अकॅडमीतील सर्व शिक्षिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र टाक, प्रास्ताविक श्री. दादासाहेब शेळके सर व आभार प्रदर्शन श्री. प्रदीप भद्रे सर यांनी केले.



stay connected