वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रत ची होळी..
पोलिस निरिक्षक अमन सिरसट यांच्या कडे दिले मागण्यांचे निवेदन
वडवणी / प्रतिनिधी
पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी या मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने बीड परळी हायवे रोड वर छञपती शिवाजी महाराज चौकात पञकार संरक्षण कायद्याच्या प्रत ची होळी करत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनात शहर व तालूक्यातील पञकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाचे निवेदन वडवणी पोलीस प्रशासनाला पोलिस निरीक्षक अमन सिरसट यांच्या कडे देण्यात आले.पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, पञकार हल्याचे खटले जलदगती न्यायालया मार्फत चालवली जावेत, पाचोरचे आ.किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी.आदी मागण्या साठी वडवणी येथे छञपती शिवाजी महाराज चौकात शहर व तालूक्यातील पञकारांनी एकञीत येऊन आंदोलन केले.यावेळी पञकार संरक्षण कायद्याच्या प्रत ची जाहिर होळी करण्यात आली. आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शासनाने पञकार संरक्षण कायद्याची प्रभावी व कडक अमंलबजावणी करावी.अशी यावेळी मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकारांनी दिलेल्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषदेचे वडवणी तालुका अध्यक्ष विनायक जाधव, माजी अध्यक्ष सुधाकर पोटभरे, सचिव सतिश सोनवणे, डिजिटल मिडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष ओमप्रकाश साबळे, पत्रकार महेश सदरे, पत्रकार शांतीनाथ जैन,पत्रकार अतुल जाधव,पत्रकार वाजेद पठाण,पत्रकार धम्मपाल डावरे, पत्रकार हरी पवार, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार डॉ नहार, पत्रकार शंकर झाडे,पत्रकार अशोक फपाळ सह आदी सहभागी झाले होते.



stay connected