Beed Live : BJP Government सर्वसामान्य जनतेला उध्वस्त करत आहे : Sharad Pawar

 Beed Live : BJP Government सर्वसामान्य जनतेला उध्वस्त करत आहे : Sharad Pawar






केंद्रातील सत्ता सर्वसामान्य जनतेला उध्वस्त करत आहे - शरद पवार

बीड (प्रतिनिधी ) - मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल.. मी पुन्हा येईल.. असे सांगितले होते. मात्र देवेंद्र पुन्हा आले पण सीएम म्हणून नव्हे तर उपमुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल मी पुन्हा येईल असे सांगितले आहे, मात्र मोदींनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घ्यावा असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. माझं वय झालं म्हणता पण तुम्ही माझं काय बघितलं अशा परखड शब्दात शरद पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या बंडखोरांना इशाराही दिला आहे .

आज बीड येथे खा शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य स्वाभीमान सभेचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी बोलताना खा . शरद पवार म्हणाले की देशाची सत्ता चमत्कारी लोकांच्या हाती आली आहे . जात धर्म भाषा यावरून समाजात अंतर वाढविण्याची निती त्यांची आहे . गावा गावात द्वेष पेरला जात आहे . काळया आईची सेवा करणारा शेतकरी अडचणीत आहे . महागाई चा प्रश्न गंभीर बनला आहे . जातीय तेढ निर्माण केले जात आहे स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते . घरे जाळली जात आहेत . पंतप्रधान मात्र मणिपूरकडे ढूंकूनही पाहत नाही . केंद्र सरकार जनतेला उध्वस्त करत आहे . ठाण्यातही सरकारी दवाखाण्यात 18 लोक मृत्यूमुखी पडली . सत्तेचा गैरवापर होत आहे . यांना आवर घालण्याची वेळ आली आहे . पंतप्रधान म्हणाले मी पुन्हा येईल . त्यांनी देवेंद्र फडणवीस चे मार्गदर्शन घ्यावे . असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधानांना लगावला .

याप्रसंगी जयंत पाटील ,जितेन्द्र आव्हाड , रोहीत पवार , अनिल देशमुख , महेबुब शेख ,दरेकर नाना आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी बोलताना आ संदीप क्षिरसागर म्हणाले की राजकारणात भूमीका फार महत्त्वाची असते यापूर्वी सुद्धा आम्ही कधीही भूमिका सोडली नाही. शरद पवार साहेबांच्या आशीर्वादामुळेच मी आमदार म्हणून निवडून आलो . पक्षाची पुरोगामी विचाराची जी भूमिका आहे, ती घेऊनच लोक आपल्याला स्वीकारत असतात. मला जिल्हाध्यक्षपदी संधी दिली तेव्हा लोकांनी मला खूप मान दिला. मला लोक डोक्यावर का घेतात, एक दिवसात माझी लोकप्रियता का वाढली तर ही पवार साहेबांची जादू आहे.


आपल्याला सोडून गेलेल्यांना आता जिल्ह्यातील जनता त्यांची जागा दाखवून देतील. काही नेते काय हातवारे करून भाषणे करत होते. साहेबांचा नाद करायचा नाही म्हणायचे, पण आता जे सोडून गेले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत. मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार साहेब तुमच्या पायाशी राहणार असे सांगत आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे येथील जनता पवार साहेबांना साथ देईल असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.


बीड येथे आज 17 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमान महासभेचे आयोजन करण्यात आले होते . खासदार शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला बीड जिल्ह्याचा कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील पारस नगरी येथे या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.