हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
आष्टी प्रतिनिधी
यावर्षी दिनांक 18 ऑगस्ट 2023, सकाळी 10 वाजता,आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.नवीन शैक्षणिक धोरण व रोजगाराच्या संधी,बदलते राजकारण व लोकशाही,कृषी क्षेत्रातील संधी आणि आव्हाने हे तीन वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. प्रथम,द्वितीय,तृतीय पारितोषिकाच्या स्वरूपात अनुक्रमे 5001,3001,2001, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असून संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने, डॉ.गणेश पिसाळ,सर्व मान्यवर संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक समितीच्या वतीने उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे.. 9421340955, उपप्राचार्य अविनाश कंदले..9834970419, डॉ.दत्तात्रय मुंढे, प्रा.जैनुल्ला खान पठाण,डॉ.मंगेश शिरसाठ, डॉ.रवी सातभाई,डॉ.संतोष वनगुजरे, प्रा.सचिन कल्याणकर,प्रा.शोभा नरोटे, प्रा.विजय गव्हाणे,प्रा.आनंद देशमुखे,श्रीमती सरस्वती जाधव,सांस्कृतिक मंडळ हे परिश्रम घेत आहेत.ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली राहील,स्पर्धकांनी आपले विचार फक्त मराठी भाषेतच मांडावेत,प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ मिळेल,स्पर्धेसंबंधी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.असे संयोजक समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.जास्तीत जास्त स्पर्धकांनी या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा. असे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी आवाहन केले आहे.


stay connected