उल्हासनगर महानगरपालिकेचे भ्रष्ट नगररचनाकार प्रकाश मुळये यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्तिचे उपोषण

 उल्हासनगर महानगरपालिकेचे भ्रष्ट नगररचनाकार प्रकाश मुळये यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्तिचे उपोषण



ठाणे दि :-(रमेश कांबळे)  उल्हासनगर महानगरपालिकेचे भ्रष्ट नगररचनाकार प्रकाश मुळये यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्तिचे जिल्हा अध्यक्ष अॅड.स्वप्नील पाटील यांनी आपल्या सहका-यांसह शासकिय विश्रामगृह ठाणे येथे बेमुदत उपोषण सुरू आहे.

 निगरगट्ट प्रशासनाने मंडप उभारणीस परवानगी नाकारली तरी आंदोलनकर्ते 

ऊन पावसाची तमा न बाळगता उपोषणास बसले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार महापालिकेचे अधिकारी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी पोहचले आहेत.मात्र प्रकाश मुळ्ये या मुख्य

गुन्हेगारावर गुन्हा दाखल होईपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहिल, थातुरमातुर कारवाई करून आमच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न झाल्यास आमचे आमरण उपोषण सुरूच राहिल, असा निर्धार स्वप्निल पाटील यांनी व्यक्त केला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.